नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील काकपोरा येथे भारतीय सैन्याने लष्कर ए तोयबाच्या कमांडरचा खात्मा केला आहे.
बुधवारी पुलवामा जिल्ह्यात भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांत चकमक झाली. या चकमकीत भारतीय सैन्याने दहशतवाद्याचा खात्मा केला आहे.
या दहशतवाद्याचं नाव अयूब लेलहारी असल्याची माहिती समोर येत आहे.
तसेच अयूब लेलहारी हा लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर असल्याचं वृत्तही समोर येत आहे.
LeT commander Ayub Lelhari killed in encounter with security forces in J&K 's Pulwama (visuals deferred) pic.twitter.com/1eG1x247NW
— ANI (@ANI) August 16, 2017
दक्षिण काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी दहशतवादी आणि भारतीय सैन्य यांच्यात चकमक झाली होती. त्यावेळी भारतीय सैन्याने हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा कमांडर यासिन इटू याच्यासह तीन दहशतवाद्यांना ठार केलं होतं.
जैनापोरा परिसरातील अवनीरा गावात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर जम्मू-काश्मीर पोलीस, भारतीय सैन्य दल तसेच सीआरपीएफने त्या परिसरात घेराबंदी केली आणि सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं.
सर्च ऑपरेशन दरम्यान, दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली त्यानंतर भारतीय सैन्याने त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.