केंद्रीय गुप्तचर विभागात १४३० पदांसाठी मेगाभरती

तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, केंद्रीय गुप्तचर विभागात भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 16, 2017, 09:45 PM IST
केंद्रीय गुप्तचर विभागात १४३० पदांसाठी मेगाभरती title=

नवी दिल्ली : तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, केंद्रीय गुप्तचर विभागात भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या गुप्तवार्ता विभागात (इंटेलिजन्स ब्युरो) तब्बल १४३० पदांसाठी मेगाभरती होत आहे. त्यामुळे ही तुमच्यासाठी नोकरीची एक सुवर्णसंधीच उपलब्ध झालेली आहे. 

गुप्तवार्ता विभागात (इंटेलिजन्स ब्युरो) असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर म्हणजेच सहाय्यक गुप्तचर अधिकारी (ग्रेड २) या पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक आणि अर्हताप्राप्त उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

खुला प्रवर्ग

९५१

ओबीसी

१८४

एससी

१०९

एसटी

 ५६

एक्स सर्विसमन

१३०

एकूण जागा

१४३०

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा दिनांक : १२ ऑगस्ट २०१७ पासून

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २ सप्टेंबर २०१७

शैक्षणिक पात्रता : पदवीधर किंवा समतुल्य तसेच संगणकाचे ज्ञान आवश्यक

वयाची अट : १८ ते २७ वर्षे

या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुकांनी www.mha.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.