Leena Nagwanshi Death : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिशा शर्मा (Tunisha Sharma) हिच्या आत्महत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. लीना नागवंशी (Leena Nagwanshi) (22 वर्षीय) असे या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे नाव आहे. तिच्या या आत्महत्येने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. लीना नागवंशी हिचा मृतदेह तिच्याच घराच्या टॅरेसवर सापडला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करतायत.
मुळची छत्तीसगडची असलेली लीना नागवंशी (Leena Nagwanshi) ही एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होती. सोशल मीडियावर ती नेहमीच चर्चेत असायची. बीकॉमच्या तिसऱ्या वर्षात शिकणारी लीना नागवंशी सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. इंस्टाग्रामवर तिचे 11 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.या 11 हजार फॉलोअर्सना लीनाच्या आत्महत्येने मोठा धक्का बसला आहे.
लीना नागवंशी (Leena Nagwanshi) हिने आत्महत्या करण्याच्या दोन दिवसांपुर्वीच म्हणजेच ख्रिसमसला इन्टाग्रामवर एक पोस्ट केली होती.या पोस्टमध्ये तिने एक रिल शेअर केला होता. या रीलमध्ये ती लाल रंगाचा ड्रेस परिधान करताना दिसली होती. ती एका मुलाला आपल्या मिठीत घेऊन जात असताना दिसत आहे. ही तिची शेवटची इन्टाग्राम पोस्ट ठरली होती. विशेष म्हणजे या पोस्टला तिने कोणतेही कॅप्शन दिले नव्हते. त्यामुळे या पोस्टमध्ये तिच्या मृत्यूचे गुढ लपल्याचा संशय पोलिसांना आहे.
लीना नागवंशी (Leena Nagwanshi) हिने घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे. छत्तीसगडमधील रायगढच्या केलो बिहार कॉलनीत ही घटना घडलीय. या घटनेने लीनाच्या कुटूंबीय आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच छत्तीसगड राज्यात या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
लीना नागवंशीने (Leena Nagwanshi) नेमकी आत्महत्या का केली याचे ठोस कारण समोर आले नाही आहे. सुत्रांनुसार तिने वैयक्तीक कारणामुळे आत्महत्या केल्याची माहिती आहे. मात्र हे या आत्महत्ये मागचं ठोस कारण असल्याची शक्यता खुप कमी आहे. त्यात तिच्या शेवटच्या पोस्टमध्ये देखील अनेक कारणे लपली आहेत. त्यामुळे पोलीस या मृत्यूचे गुढ लवकरच उकळतील, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
केलो विहार कॉलनीत राहणाऱ्या 22 वर्षीय लीनाने (Leena Nagwanshi) घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती त्यांना मिळाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला असल्याचे चक्रधर नगर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक दिनेश बोहिदार यांनी सांगितले आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण समजणार आहे, असेही दिनेश बोहिदार यांनी सांगितले.
दरम्यान या प्रकरणाचा तपास आता पोलीस करत आहेत. पोलीस लवकरच या मृत्यूचे गुढ उकळलीत, अशी अपेक्षा आहे.