Stains removal : सध्या लग्नसराई आहे, लग्नात चांगले कपडे घालून गेलो कि कपड्यांवर काही जेवणाचे डाग लागू शकतात कधी कधी हळदीच्या कार्यक्रमात गेल्यावर सुद्धा चांगले कपडे डाग लागून खराब होतात मग अश्या वेळी काय करायचं असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. अश्या वेळी एकत्र आपण ते कपडे फेकून देतो कारण अशी मानसिकता असते कि आता हे रंग काही केल्या जाणार नाहीत आणि बऱ्याचदा जातसुद्धा नाहीत मग काय कपडे वाया जातात. (stain removal)
पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं कि काही अश्या टिप्स आहेत ज्या वापरून तुम्ही कपड्यांवरील हे हट्टी डाग काढू शकता आणि कपडे पुन्हा वापरूसुद्धा शकतो. तर तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. चला तर मग जाणून घेऊया अश्याच काही सोप्या आणि मस्त उपायांबद्दल...(how to remove stains from clothes)
लगेच घाई नका करू
जर तुमच्या कपड्याने हळदीचा डाग लागला असेल तर तो लगेच काढण्याची घाई नका करू, मार्केट मध्ये मिळणाऱ्या लिक्विड डिटर्जंटच्या मदतीने त्या डागाला रब करा आणि काही काळ हा कापड उन्हात सुकू द्या आणि मग तो कपडा धुवून टाका... तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.
टूथपेस्ट
हळदीचा हट्टी डाग काढण्यासाठी टूथपेस्ट खूप कमी येईल, हा उपाय खूप कमी लोकांना माहित आहे, यासाठी तुम्हाला केवळ इतकंच करायचंय जिथे हळदीचा डाग लागला आहे तिथे टूथपेस्ट हाताने लावा आणि घासा, थोडा वेळ तसच राहूद्या आणि मग मशीनमध्ये धुवून काढा.
व्हाईट विनेगर
डाग काढण्यासाठी व्हिनेगरचा वापर कारण केव्हाही चांगलं दोन चमचे व्हिनेगर घ्या यात लिक्विड डिटर्जंट घाला आणि ज्या ठिकाणी हळदीचा डाग लागला आहे त्या ठिकाणी हे मिश्रण ओता ३० मिनिटासाठी कापड असाच राहूद्या या नंतर गरम पाण्याने याला वॉश करा.
लिंबू
लिंबाचा वापर कोणताही डाग काढण्यासाठी अतिशय फायदेशीर समजलं जात. बऱ्याच कंपन्या आपल्या प्रोडक्टस मध्ये याचा वापर सर्रास करतात.तुमच्या कपड्यांवर हळदीचा डाग लागल्यावर त्वरित त्यावर लिंबू चोळा काहीवेळ तसेच राहून द्या आणि मग रब करून धुवून टाका.
थंड पाणी
कदाचित तुम्हाला माहित नसेल पण थंड पाणी कपड्यांवर लागलेला डाग हटवण्याच काम करतो . हळदीचा डाग लागलेला कापड थंड पाण्यात भिजवून ठेवा आणि अर्ध्या तासानंतर तो धुवून काढा.
(टीप : वरील माहिती माहितीच्या आधारावर आहे झी २४ तास याची खातरजमा करत नाही )