हस्तिदंत इतकं महाग का आहे, त्याला का मिळते लाखोंची किंमत? जाणून घ्या

तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का, की? याला इतक्या महाग किंमतीत का विकले जाते?

Updated: Mar 5, 2022, 04:52 PM IST
हस्तिदंत इतकं महाग का आहे, त्याला का मिळते लाखोंची किंमत? जाणून घ्या title=

मुंबई : आपण हे बऱ्याचदा ऐकलं आहे की, हस्तिदंताची तस्करी केली जाते. याची किंमत लाखो रुपयांमध्ये असते. परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का, की? याला इतक्या महाग किंमतीत का विकले जाते? यामध्ये नक्की असं आहे तरी काय की, ज्यामुळे त्यासाठी लोक लाखो, करोडो रुपये मोजायला तयार होतात. तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल काही माहिती सांगणार आहोत. तसे पाहाता या हस्तिदंतामध्ये असे कोणतेही घटक नाहीत, ज्यामुळे त्याची किंमत इतकी महाग विशेष बनते. परंतु त्याला सांस्कृतिक मूल्य असल्यामुळे त्याला मौल्यवान मानले जाते.

तसेच ते स्टेटस सिम्बॉलशी संबंधित आहे आणि त्यामुळे त्याची किंमत खूप जास्त आहे. मागणी प्रमाणे तेवढे हस्तिदंत उपलब्ध नाही, यामुळे देखील ते इतके महाग विकले जाते.

हस्तिदंताला लक्झरीचे प्रतीक मानले जाते. इतक्या महागड्या किंमतीत त्याला विकत घेतल्याने ते खूप प्रसिद्ध झाले आहे.

हस्तिदंत किती किमतीला विकले जाते? जर आपण हस्तिदंताच्या किंमतीबद्दल बोललो तर ते खूप महागात विकले जाते. त्यांच्यासाठी कोणतेही निश्चित दर नाहीत, परंतु ते बरेच महाग आहेत. काही वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये 17 किलो हस्तिदंत सापडले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 1 कोटी 70 लाख रुपये आहे.

यावरून त्याच्या एका किलोची किंमत 10 लाख रुपये असल्याचा अंदाज बांधता येतो. म्हणजेच हस्तिदंत 10 किलोचे असेल तर त्यासाठी 1 कोटी रुपये मोजावे लागतात. मात्र, यामुळे हत्तींच्या मृत्यूच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे याच्या विक्रीला बंदी घालण्यात आली आहे.