Aadhaar Card च्या मागे या कारणासाठी असतो QR Code, व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घ्या महत्त्व

आधार कार्ड हे भारतातील महत्त्वपूर्ण दस्ताऐवज आहे. सर्वांसाठी महत्त्वाचे आणि आवश्यक कागदपत्र आहे.

Updated: Sep 26, 2022, 01:46 PM IST
Aadhaar Card च्या मागे या कारणासाठी असतो QR Code, व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घ्या महत्त्व title=

Aadhaar QR Code Scanner: आधार कार्ड हे भारतातील महत्त्वपूर्ण दस्ताऐवज आहे. सर्वांसाठी महत्त्वाचे आणि आवश्यक कागदपत्र आहे. आधार कार्डाशिवाय महत्त्वाची कामं अडकतात. शिवाय कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. आतापर्यंत, भारतात 133 कोटींहून अधिक आधार कार्ड जारी केले गेले आहेत आणि आपल्या सर्वांकडे स्वतःचे आधार कार्ड आहेत. आधार कार्डच्या मागे QR कोड असतो. या QR Code चं महत्त्व काय आहे? जाणून घेऊया.

आधार कार्डच्या मागील बाजूस दिलेल्या QR कोडमध्ये तुमची सर्व महत्वाची माहिती असते. नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग आणि फोटो असतो. याशिवाय या QR कोडमध्ये मास्क्ड मोबाइल नंबरवर ईमेल देखील असतो. आधार कार्डच्या मागील बाजूस छापलेला हा QR कोड स्कॅन करून तुम्ही तुमची ओळख व्हेरिफाय करू शकता. QR कोडद्वारे तुमची ओळख व्हेरिफाय करण्यासाठी तुम्ही UIDAI चे अधिकृत मोबाइल अ‍ॅप, आधार QR कोड स्कॅनर वापरू शकता. यासाठी तुम्हाला प्रथम आधार QR स्कॅनर मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल.

अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर आधार कार्डच्या मागील बाजूस छापलेला QR कोड स्कॅन कराल तेव्हा तुम्हाला नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता, ईमेल आणि मास्क्ड केलेला मोबाइल नंबर तुमच्या फोटोसह तुमच्या मोबाइल फोनच्या स्क्रीनवर दिसेल. तुम्ही तुमच्या आधार कार्डची सहज पडताळणी करू शकता. आधार कार्डवर मुद्रित केलेला QR कोड UIDAI द्वारे डिजिटल स्वाक्षरी केलेला आहे. याच्या मदतीने तुम्ही ऑफलाइन असतानाही तुमचा आधार कुठेही आणि कधीही पडताळू शकता.