Karnataka Election Result: कर्नाटकात काँग्रेस... 38 वर्षांची परंपरा खंडीत करण्यात भाजपाला अपयश, वाचा कारणं

Karnataka Election 2023 Result: कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. तर भाजपाला अपेक्षेपेक्षाह कमी जागा मिळाल्य आहेत. 

राजीव कासले | Updated: May 13, 2023, 12:34 PM IST
Karnataka Election Result: कर्नाटकात काँग्रेस... 38 वर्षांची परंपरा खंडीत करण्यात भाजपाला अपयश, वाचा कारणं title=

Karnataka Assembly Election Result: कर्नाटकात भारतीय जनता पार्टी (BJP) 38 वर्षांची परंपरा खंडित करण्यात अपयशी ठरली आहे. कर्नाटकात 1985 नंतर कोणताही पक्ष दुसऱ्यांदा सत्तेत आलेला नाही. ही विधानसभा निवडणूकही याला अपवाद ठरली नाही. कर्नाटकात पुन्हा एकदा काँग्रेसची (Congress) सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. सुरुवातीच्या निकालानुसार काँग्रेसने 113 हा बहुमताचा आकडा पार करत एक हाती सत्तेच्या दिशेने वाटचाल केली आहे. काँग्रेस बहुमतापेक्षा जास्त म्हणजे 122 जागांवर आघाडीवर आहे. 

हा कौल निकालात रुपांतर झाल्यास 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसू शकतो. कारण दक्षिणेतील कर्नाटक (Karnataka) हे एकमेव राज्य आहे जिथे भाजपचे सरकार आहे. कर्नाटक भाजपच्या हातून निसटण्याची कारणंही समजून घेतली पाहिजेत. 

उत्तर भारताचा पक्ष असल्याचा शिक्का
दक्षिणेत भाजपाला एकही राज्य न मिळण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे भाजप हा पक्ष उत्तर भारताचा पक्ष असल्याचं इथल्या लोकांचं मत आहे. याशिवाय काही घटनांमुळे दक्षिण भारतीयांमध्ये भाजपविषयी नाराजी आहे. गोमांस वाद, हिंदी भाषेला प्राथमिकता हे काही यापैकीच प्रमुख मुद्दे आहेत.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) हिंदुत्वाच्या परिभाषेतील जीवनपद्धती आजही कर्नाटकातील लोकांसाठी परकी आहे. 

येदियुरप्पांवर अविश्वास
येदियुरप्पांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते, त्यात त्यांना तुरुंगासही झाला. पण न्यायालयाच्या निकालानंतर येदियुरप्पा (B. S. Yediyurappa) यांच्यावरील भ्रष्टाचाराचा डाग पुसला गेल्याचा दावा भाजपने केलाय. पण काँग्रेसच्या सिद्धरमैया (Siddaramaiah) यांचा रेकॉर्ड येदियुरप्पा यांच्यापेक्षा चांगला असल्याचं इथल्या लोकांना वाटतंय. मुख्यमंत्री बसबराज बोम्मई (Basavaraj Bommai) कर्नाटकात भाजपचा प्रमुख चेहरा होते. भाजप पुन्हा सत्तेत आल्यास बोम्मईच मुख्यमंत्री होतील असे स्पष्ट संकेतही पक्षाने दिले होते. 

पण हे सत्यही नाकारुन चालणार नाही, ते म्हणजे 80 वर्षांचे बीएस येदियुरप्पा पक्षाचे सर्वात मोठे नेता आहेत. त्यामुळे बसवराज बोम्मई पक्षाचा चेहरा असेल तरी पक्षात सर्व काही येदियुरप्पा यांच्या मताने होत होतं. तिकिट वाटपातही येदियुरप्पांचा वाटा मोठा होता. या कारणामुळे कर्नाटकात भाजपची नव्या आणि जुन्या पिढीत दुरावा जाणवला. यावरुन सार्वजनिक आरोप-प्रत्यारोपही झाले. 

विकास कामं पोहोचवण्यात कमी
भाजपने राबवलेली विकास कमी सामन्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात भाजपला आलेलं अपयश हे देखील त्यांच्या पराभवामागचं एक प्रमुख कारण असल्याचं बोललं जातंय. निवडणुकीच्या प्रचारातही कर्नाटक सरकारच्या योजनांचा उल्लेख करण्यात आला नाही. याचा मोठा फटका कर्नाटकात भाजपाला बसला आहे.