Karnataka Election Result 2023 : कर्नाटकातील 224 जागांच्या निकालाचे कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेसने (Congress) 118 अधिक जागांवर आघाडीवर घेतली आहे. तर भाजप (BJP) 75 जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएसने (JD(S) 24 जागांवर आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलानुसार, काँग्रेस 115 हून अधिक जागांवर आघाडीवर असून राज्यातील बहुमताचा आकडा 113 आहे. त्यामुळे काँग्रेसकडे बहुमत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी बेळगावकडे सगळ्यांकडे लक्ष लागले होते. येथे काँग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याची दिसून येत आहे. भाजपला मोठा फटका बसला आहे. संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी कर्नाटक विधानसभा निवडणूक आगामी 2024ला होणार्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जाते. इथे काँग्रेसने बाजी मारल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजपचा सुपडा साफ होताना दिसत आहे.
राज्यभरात 34 ठिकाणी मतमोजणी होणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील सर्व 18 मतदारसंघांची मतमोजणी बेळगाव शहरातील राणी पार्वतीदेवी महाविद्यालयात सुरु आहे. बेळगाव दक्षिणमध्ये दुसऱ्या फेरीतील मतमोजणी सुरु झाली असून भाजपचे आमदार अभय पाटील साडेतीन हजार मतांनी पुढे आहेत. गोकाकमध्ये भाजपचे रमेश जारकीहोळी पिछाडीवर आहेत. चिकोडी सदलगा मतदारसंघात गणेश हुक्केरी आघाडीवर आहेत. बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकार आघाडीवर आहेत. यमकनमर्डीत आमदार सतीश जरकिहोळी अडीच हजार मताने आघाडीवर आहेत.
बेळगाव ग्रामीणमधून काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहे. तर भाजपला येथे मोठा फटका बसला आहे. अपक्ष उमेदवार दोननंबरवर असून भाजप तिसऱ्या क्रमांकाला फेकला गेला आहे. याठिकाणी आम आदमी पार्टीचे उमेदवारही रिंगणात उतरविण्यात आला होता. मात्र, त्याला 200 मतांचा आकडा गाठता आलेला नाही.
लक्ष्मी आर. हेब्बाळकर ( काँग्रेस) 50,083 यांनी मते मिळाली असून आर.एम. चौगुले (अपक्ष ) 32,165 हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर नागेश आण्णाप्पा माननोळकर (भाजप) 14,074 हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. बेळगाव उत्तरमधून काँग्रेसचे आसिफ (राजू) सैत 30892 आघाडीवर आहेत. तर भाजपचे डॉ. रवी बी पाटील 27785 यांना इतकी मते मिळाली आहेत.
बेळगाव दक्षिणमधून भाजपचे अभय पाटील हे 58704 मतांनी आघाडीवर असून काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. येथे अपक्ष उमेदवार रामकांत कोंडुस्कर 51828 मते घेत जोरदार लढत दिली आहे. काँग्रेस उमेदवार प्रभावती बसवराज मस्तमर्डी यांना 10876 मते पडली आहेत.
तर कोल्हापूर जवळील निपाणीमध्ये भाजपचा उमेदावर जोल्ले शशिका अण्णासाहेब 31823 मतांनी आघाडीवर आहेत. राष्ट्रवादीचे उत्तम रावसाहेब पाटील मागे पडले आहेत. त्यांना 30551 मते मिळाली असून ते पिछाडीवर आहेत. येथे काँग्रेस उमेदवार काकासाहेब पी. पाटील 20736 मते मिळाली आहेत.