नवी दिल्ली : कारगिलमध्ये भारतीय जवानांनी पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करत ऐतिहासिक विजय मिळवला होता. या ऐतिहासिक विजयाला आज १८ वर्ष पूर्ण झालीत.
या निमित्ताने कारगिलच्या द्रास सेक्टरमध्ये शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शहीद जवानांच्या कुटुंबीयांचाही सन्मान करण्यात आला. ६० दिवस चाललेलं युद्ध २६ जुलै १९९९ रोजी संपलं. या युद्धात पाचशेहून अधिक जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. या शहीदांची आठवण म्हणून दरवर्षी २६ जुलै हा दिवस 'कारगिल विजय दिवस' म्हणून ओळखला जातो.