कुमारस्वामींचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा

येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर अर्थातच जेडीएस नेते कुमारस्वामी यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झालाय.   

Updated: May 19, 2018, 04:23 PM IST
कुमारस्वामींचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा  title=

बंगळुरू : कर्नाटकात अवघ्या अडीच दिवसांत बी एस येडियुरप्पांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं सरकार कोसळलंय. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी १११  मतं मिळवण्यात भाजपला अपयश आलंय... त्यामुळे बहुमत चाचणी अगोदरच बी एस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रपदाचा राजीनामा दिलाय. बहुमत चाचणी अगोदरच येडियुरप्पांची माघार घेतलीय. त्यामुळे अर्थातच जेडीएस नेते कुमारस्वामी यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झालाय. 

येडियुरप्पांचा राजीनामा

येडियुरप्पांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्या अगोदर त्यांनी विधानसभेत भावनिक भाषण केलं. यावेळी येड़ियुरप्पा यांनी आपण राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले होते. आपल्याकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने आपण राजीनाम देत आहोत, असं येडियुरप्पा यांनी म्हटलं. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानले आहेत, आम्ही नंबर वनचा पक्ष म्हणून पुढे आलो. सिद्धरामय्या यांच्या अपयशामुळे आम्हाला यश मिळालं, असं येडियुरप्पा यांनी आपल्या भाषणात सांगितलं. येडियुरप्पा आपल्या भाषणात अतिशय भावूक आहेत. आम्ही कमी आकड्यावरून कसे वाढत गेलो, असंही येडियुरप्पा यांनी आपल्या भाषणात सांगितलं. येडियुरप्पा भाषण करताना संतापलेले तर होतेच, पण भावूकही दिसत होते.