Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात 14 वर्षांचा मुलगा देवी काली बनला होता तर, 11 वर्षांचा एक मुलाने राक्षसाची भूमिका साकारली होती. या कार्यक्रमाचे खूप कौतुक होत होते. मात्र, त्याचवेळी मोठी दुर्घटना घडली आहे. ज्याची कोणी कल्पनादेखील केली नसेल.
14 वर्षांच्या मुलाने काली मातेची भूमिका साकारली होती. नाटक सुरू असतानाच ही दुर्घटना घडली आहे. काली माताची भूमिका साकारलेल्या मुलाच्या हातात चाकू होता. त्याच चाकूमुळं 11 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 11 वर्षांचा मुलगा राक्षस बनला होता. नाटक सुरू असतानाच काली माता बनलेल्या मुलाच्या हातातील चाकूने चिमुकल्याल्याच्या गळ्यावर वार झाले. त्यात तो गंभीररित्या जखमी झाला होता. जखमी मुलाला घेऊन तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 14 वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतलं आहे.
कानपूरच्या बिल्होर क्षेत्रातील बगियापूर गावात ही घटना घडली आहे. सुभाष सैनी यांच्याकडे बुधवारी रात्री देवी भगवतीचे जागरण होते. त्यामुळं आजू-बाजूची सर्व मुलंदेखील सहभागी झाली होती. जागरणानंतर एका कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. ज्यासाठी परिसरातीलच एका 14 वर्षीय मुलाने कालीमातेची भूमिका केली होती. या मुलाला काली मातेच्या रुपात सजवण्यात आले होते. तसंच, एका 11 वर्षांच्या मुलाला राक्षसाच्या रुपातही सजवण्यात आले होते.
काली मातेचे त्रिशुळ राक्षसाच्या मानेवर असते, हे तर माहितीच आहे. त्याचप्रमाणे नाटकातही तसेच दृश्य तयार करण्यासासाठी कुटुंबीयांनी एका बबलू कश्यप या 11 वर्षांच्या मुलाला काली माता बनलेल्या मुलाच्या समोर उभं केलं. त्यासोबतच अनेक मुलांनादेखील उभं केलं होतं. मात्र, काली बनलेल्या मुलाला त्रिशूळ सापडलं नाही म्हणून त्याच्या हातात घरवाल्यांनी धारदार चाकू दिला. तो चाकू काली माता बनलेल्या मुलाला राक्षस बनलेल्या मुलाच्या गळ्यावर ठेवायचा होता.
कार्यक्रम सुरू झाला. मात्र, कुटुंबीयांनी मुलाला समजवण्याचे राहून गेले की त्या चाकूला किती धार आहे आणि तो चाकू फक्त गळ्यावर ठेवायचा नाही. त्यामुळं कार्यक्रमातच अघटित घडलं. अचानक मुलाने 11 वर्षीय मुलाच्या गळ्यावरुन चाकू फिरवला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळं क्षणात सगळीकडे रक्त सांडले. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. 14 वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतलं आहे.