ATM मधून फाटलेल्या नोटा निघाल्यात? घाबरू नका, 'या' पद्धतीने मिळवा कोऱ्या करकरीत नोटा

Damaged Note Exchange RBI Rule: एटीएममधून फाटलेल्या नोटा निघाल्यात का? तर घाबरु नका. पाहा RBIचा नियम काय सांगतो?

मानसी क्षीरसागर | Updated: May 5, 2024, 02:33 PM IST
ATM मधून फाटलेल्या नोटा निघाल्यात? घाबरू नका, 'या' पद्धतीने मिळवा कोऱ्या करकरीत नोटा title=
how to exchange your damaged currency notes in banks know RBI rule

Damaged Note Exchange RBI Rule: एटीएममध्ये पैसे काढायला गेल्यानंतर अनेकदा त्यातून फाटलेले नोटा येतात. एटीएममधून फाटलेल्या नोटा आल्यानंतर त्याचे करायचे काय? असा प्रश्न पडतो. फाटलेल्या नोटा कोणता दुकानदारदेखील घेत नाही. अशावेळी या नोटा वापरायच्या तरी कशा, यामुळं नागरिक चिंतेत असतात. मात्र, या नोटा आता तुम्ही आरामात बदलू शकता आणि त्याऐवजी नवीन नोटा मिळवू शकता. जाणून घ्या. 

बँकेतदेखील तुम्ही आरामात या नोटा बदलू शकतात. बँक कधीच नोटा बदलून देण्यासाठी नकार देत नाहीत. भारतीय रिझर्व्ह बँकने फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी काही नियम बनवले आहेत. तर, टीव्ही व सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना जागरुकदेखील करत आहेत. त्यामुळं आता फाटलेल्या नोटांना गपचूप चिटकवणे किंवा गपचूप त्या चालवणे असं प्रताप करण्याऐवजी आरबीआयच्या नियमांतर्गंत नोट बदलू शकता. 

फाटलेल्या नोट बदलणे खूपच सोप्पे

फाटलेल्या नोटा मिळाल्या तर अजिबात घाबरू नका. तुम्ही आरामात ही नोट बदलू शकता. RBIच्या नियमांनुसार, ATM मधून फाटलेल्या नोटा मिळाल्या तर बँक त्या बदलून देण्यास नकार देऊ शकत नाही. बँकेत जाऊन नोट बदलण्याची प्रक्रिया फार कठिणही नाहीये. तर एका मिनिटात हे काम होणार आहे. नोटा कशा बदली करायच्या हे जाणून घेऊया. 

सगळ्यात पहिले तुम्हाला ज्या ATM Machine मध्ये या फाटलेल्या नोटा मिळाल्याआहेत. त्या बँकेत जा. तिथे जाऊन तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे. तिथे तुम्ही एटीएममधून कधी पैसे काढले, वेळ आणि कोणत्या एटीएममधून काढले. हे सगळं त्यात लिहायला विसरू नका. त्याचबरोबर, एटीएममधून मिळालेल्या कॉपी स्लिपदेखील लावावी लागेल. जर, तुम्ही स्लिप नसेल काढली तर मोबाइलवर आलेल्या ट्रांजेक्शन डिटेलची माहिती देऊ शकता. 

तुम्ही बँकेत जेव्हा फॉर्म भरुन द्याल. तेव्हा लगेचच बँक नोटा बदलून दिल्या जातील. एप्रिल 2017मध्ये RBIने  एका गाइडलाइनमध्ये म्हटलं आहे की, बँक फाटलेल्या व खराब झालेल्या नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकत नाही. सर्व बँक त्यांच्या प्रत्येक ब्रँचमध्ये लोकांना फाटलेल्या नोटा बदलून देणे बंधनकारक आहे. 

दरम्यान, काही नोटा मात्र बदलता येत नाही. आरबीआयच्या नियमांनुसार, पूर्णपणे जळालेल्या, तुकड्या तुकडे झालेल्या नोटा बदलता येत आहे. या पद्धतीच्या नोटा आरबीआयच्या इश्यू ऑफिसमध्येच जमा करण्यात येतात. तसंच, नियमांनुसार, जर कोणत्या बँकेने तुम्हाला नोटा बदलण्यास नकार दिला तर तुम्ही त्या बँकेची तक्रार थेट केंद्रीय बँकेत करु शकता.