आपण फक्त म्हणतो, पण या बायकोनं खरोखरच नवऱ्याचं तोंड गोधडीसारखं शिवलं

पोलिसांना या घटनेबद्दल सांगताना भोला राम म्हणाला की, तो रात्री लघवी करण्यासाठी उठला होता तेव्हा...

Updated: Jul 15, 2021, 10:32 PM IST
आपण फक्त म्हणतो, पण या बायकोनं खरोखरच नवऱ्याचं तोंड गोधडीसारखं शिवलं title=

झारखंड : घरगुती छोटेमोठे वाद हे सगळयाच घरात होत असतात. काही वाद हे तेवढ्यापुरते असतात जे, सोडवले जाता. तर काही वाद हे खूप मोठे असतात. जे काही वेळा कोर्टात जाऊनच सोडवले जातात. परंतु काही वेळा हे वाद इतके भयंकर असतात की, जे एखाद्या गुन्ह्याचे रुप घेतात. उंटारी रोड पोलिस ठाण्यातील भीतिहारा गावातली मंजलीघाट टोले येथे राहणारा भोला राम या घरगुती वादाला बळी पडला आहे.

छोटासा घरगुती वाद भोला रामला इतका महागात पडला की, त्याला बायको आणि मुलाने मरण्यासाठी रेल्वे पटरीवर ठेवले होते. हे एवढचं नाही, तर याच्या पुढची गोष्ट ऐकाल तर तुम्ही हैराण व्हाल. कारण यावादात या व्यक्तीच्या बायको आणि मुलाने चक्कं सुई दोऱ्याने त्याचे तोंड शिवले आणि त्याला रेल्वेच्या पटरीवर बांधून ठेवले.

परंतु नंतर एका व्यक्तीने भोला राम याला वाचवले आणि पोलिसात याबद्दल कळवले. पोलिसांना या घटनेबद्दल सांगताना भोला राम म्हणाला की, तो रात्री लघवी करण्यासाठी उठला होता, दरम्यान त्याची दुसरी बायको सबिता आणि तिच्या पहिल्या नवऱ्याचा मुलगा तेथे आला होता. त्यांच्या सोबत त्यांनी आणखी दोन लोकांना आणले होते.

ज्यांनी भोला रामला मारहाण केली आणि नंतर रात्री अकराच्या सुमारास जबरदस्तीने त्याचे तोंड सुई-धाग्याने शिवले आणि त्याला रेल्वे पटरीवर बांधले.

त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास गावातील एक व्यक्ती शौचालयासाठी तेथे आला, तेव्हा त्याने रेल्वे लाईनच्या मधोमध एक माणूस पडलेला पाहिला. जवळ जाऊन जेव्हा त्याने पाहिले तेव्हा त्याला कळले की, हा व्यक्ती जीवंत आहे.

परंतु त्याचे हात पाय बांधले होते. तेव्हा त्याने एका दगडाच्या मदतीने त्याच्या हातातील दोरी कापून काढली. त्यावेळी तेथे बरेच लोक जमा झाले होते.

ग्रामस्थांकडून या घटने संबंधीत माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि भोला रामला तेथून डॉक्टरांकाडे घेऊन गेले, तिथे डॉक्टरांनी भोला रामचे शिवलेले तोंड उघडले. त्यानंतर पोलिस आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.