दाम्पत्यानं Instagram वर शेअर केला लग्नाच्या पहिल्या रात्रीचा VIDEO, कॅमेऱ्यासमोरच दोघांनी....

सध्याच्या सोशल मीडियाच्या (Social Media) युगात आपला व्हिडीओही ट्रेंड व्हावा, आपल्यालाही Likes मिळावेत यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. पण अशाच प्रयत्नात अनेकदा पातळी ओलांडली जातो. नुकतंच एका दांपत्याने Instagram ला थेट लग्नाच्या पहिल्या रात्रीचा व्हिडीओ शेअर केला असून तो पाहून नेटकरी संतापले आहेत.   

Updated: Feb 7, 2023, 02:18 PM IST
दाम्पत्यानं Instagram वर शेअर केला लग्नाच्या पहिल्या रात्रीचा VIDEO, कॅमेऱ्यासमोरच दोघांनी.... title=

Couple Shares Suhagrat Video: प्रत्येकाचं एक खासगी आयुष्य असतं आणि त्याच्यामध्ये बाहेरच्या लोकांनी डोकावून पाहू नये असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यातही लग्न म्हटलं तर प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. हा क्षण आयुष्यभर लक्षात राहावा यासाठी तो इतरांपेक्षा वेगळ्या प्रकारे साजरा करावा असं प्रत्येकाला वाटत असतं. पण हा क्षण जगताना आपण आणि आपला आयुष्यभराचा सहकारी दोघंच असलं पाहिजे अशी प्रत्येकाची भावना असते. पण एका दांपत्याने लग्नाच्या पहिल्या रात्रीचा व्हिडीओ (Couple Shares First Night Video) थेट इन्स्टाग्रामला (Instagram) शेअर करत कहर केला आहे. यानंतर नेटकरी संतापले असून त्यांना खडेबोल सुनावत आहेत. 

नेमकं काय झालं?

सध्या सोशल मीडियाचं (Social Media) युग आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी वेगवेगळे व्हिडीओ शूट करत ट्रेंडिंगमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतो. मग ते डान्सपासून ते आपल्या कुटुंबासोबत व्हिडीओ शूट करत व्हिडीओ अपलोड केले जातात. पण या लाईक्सच्या नादात काही लोक मात्र मर्यादा ओलांडतात. असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चर्चेत आहे. 

arushirahulofficial या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका दांपत्याने लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत दांपत्य आपल्या रुममध्ये दिसत आहे. दोघांनी लग्नातील कपडे घातलेले आहेत. यावेळी नववधू आपले दागिने काढत असल्याचं दिसत असून यावेळी पती तिला मिठी मारताना, तसंच दागिने, कपडे काढण्यास मदत करत असल्याचं दिसत आहे. आपला हा खासगी क्षण त्यांनी Instagram ला शेअर केला असल्याने युजर्स मात्र संतापले आहेत.

नेटकरी संतापले

हा व्हिडीओ पाहून युजर्स संतापले आहेत. त्यांनी दांपत्याला खडे बोल सुनावले असून काही लाईक्स मिळवण्यासाठी इतक्या खालच्या स्तराला जाण्याची गरज नाही असं म्हटलं आहे. 

एका युजरने तर व्हायरल व्हायचं असेल तर पुढच्या वेळी सगळाच व्हिडीओ टाक असं उपहासात्मकपणे म्हटलं आहे. तसंच एकाने हा तुमचा खासगी क्षण असून तो इंटरनेटवर अपलोड करण्याची गरज नव्हती. हा चित्रपट नसून आपलं आयुष्य आहे. हे क्षण दोघांनीच जगायचे असतात असं एकाने म्हटलं आहे. तसंच एका युजरने वाहन चालवण्यासाठी ज्याप्रकारे परवाना असतो तसंच इंटरनेसाठीही असला पाहिजे.