आंतरराष्ट्रीय अन्न महोत्सवाचे उद्घाटन

खवय्यांची खाण्यापिण्याची हौस पूर्ण होणार असून 'खाणाऱ्यांसाठी अच्छे दिन' 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 3, 2017, 07:06 PM IST
आंतरराष्ट्रीय अन्न महोत्सवाचे उद्घाटन  title=

नवी दिल्ली : भारतातील खवय्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतात प्रथमच एका आंतरराष्ट्रीय अन्न महोत्सवाचं उद्घाटन झाले आहे. त्यामूळे खवय्यांची खाण्यापिण्याची हौस पूर्ण होणार असून 'खाणाऱ्यांसाठी अच्छे दिन' आल्याचे म्हटले जात आहे.

अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या पुढाकाराने ३० देशांच्या प्रतिनिधी आणि ३ हजाराहून अधिक अन्नप्रक्रिया करणाऱ्या कंपन्याच्या प्रतिनिधींसोबत वर्ल्ड फूड इंडिया २०१७ चं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. 

अधिकृत उद्घाटन झाल्यानंतर दिल्लीच्या इंडिया गेटच्या परिसरात अन्न प्रक्रिया उद्योगातल्या अग्रणी कंपन्यांनी स्टॉल्स थाटलेत. या स्टॉल्सची पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि त्यांच्यासोबत अन्नप्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांनी केली. 

 याद्वारे भारताची खाद्य संस्कृतीची जगभरातली ओळख आणखी ठळक करण्यात येणार आहे. शिवाय जगातल्या अन्नप्रक्रिया उद्योगांनी भारतात त्यांचे उद्योग थाटावेत, गुंतवणूक वाढवावी जेणे करून भारतातील शेतकऱ्यांच्या मालाला अधिक भाव मिळण्याच्या उद्देशानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे.

 यावेळी बोलताना मोदींनी भारत हा गुंतवणूकीसाठी चांगला देश असल्याचे सांगितले.