मगरीचे अश्रू खरंच खोटे असतात का? या म्हणी मागे लपलंय रंजक कारण

आपण अनेकांना असं बोलताना ऐकलं असेल की, मगरीचे अश्रु दाखवू नकोस. परंतु हे ऐकून तुम्हाला कधी प्रश्न पडला का की? असे का म्हटले जाते. मगर काय नेहमी खोटी रडते का?

Updated: Jul 18, 2022, 09:53 PM IST
मगरीचे अश्रू खरंच खोटे असतात का? या म्हणी मागे लपलंय रंजक कारण title=

मुंबई : आपण अनेकांना असं बोलताना ऐकलं असेल की, मगरीचे अश्रु दाखवू नकोस. परंतु हे ऐकून तुम्हाला कधी प्रश्न पडला का की? असे का म्हटले जाते. मगर काय नेहमी खोटी रडते का? तर यावर शास्त्रज्ञांनी संशोधन केलं आहे आणि या संशोधणातून बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. संशोधकांनी सांगितले की, माणसांपासून ते प्राण्यांपर्यंत प्रत्येकाच्या अश्रूंमध्ये एकच रसायन आढळते. तसेच अश्रू नलिकाद्वारे प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात. पण मग आता तुम्ही म्हणाल की मग या मगरीबाबतच्या म्हणीचं काय? चला जाणून घेऊ या.

संशोधनादरम्यान जेव्हा मगरींना पाण्यापासून दूर कोरड्या जागी अन्न देण्यात आले तेव्हा, त्यांना निरीक्षण करण्यात आलं, तेव्हा हे जाणवलं की, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. 'बायो सायन्स'ने दावा केला आहे की, मगरी अन्न खाताना अश्रू ढाळतात आणि त्याचा कोणत्याही भावनेशी काहीही संबंध नसतो. म्हणजेच कोणत्याही कारणाशिवाय मगर रडू लागते. म्हणूनच मगरीचे अश्रू रडू नकोस असे म्हटले जाते.

परंतु याचा अर्थ असा नाही की मगरींना भावना नसतात, मगरींना भावना असतात. परंतु जेवणच्या वेळी त्या रडतात त्या कोणत्याही कारणाशिवाय रडतात.

आमी तुम्हाला सांगतो, मगर असो किंवा सुसर दोघेही सरपटणारे प्राणी अन्न खाताना अश्रू ढाळतात. तो दोघेही दिसायला सारख्या दिसत असल्या तरी त्यांच्यामध्ये फरक आहे. सुसरचे तोंड U आकाराचे असते आणि मगरीचे तोंड V आकाराचे असते.

परंतु सुसरचा जबडाही मगरीपेक्षा रुंद असतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, माश्या या मगरीचे अश्रू पितात. कारण मगरीच्या अश्रूंमध्ये प्रथिने आणि खनिजे असतात.