शौचालयासाठी खड्डा खोदताना मजूर बनले करोडपती, पण त्यांची एक चूक आणि सगळं गमावलं....

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, धनलाभ झाल्यानंतर असं अचानक काय घडलं की, त्यांना या पैशांचं लाभ घेता आलं नाही?

Updated: Jul 18, 2022, 09:17 PM IST
शौचालयासाठी खड्डा खोदताना मजूर बनले करोडपती, पण त्यांची एक चूक आणि सगळं गमावलं.... title=

मुंबई : अचानक धनलाभ झाल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. पण तसे पाहाता हा धनलाभ सगळ्याच लोकांना फळाला येतंच असे नाही. असंच काहीसं उत्तर प्रदेशातील कामगारांसोबत घडलं. तेथे या कामगारांना शौचालय बनवण्याच्या कामासाठी बोलवले गेले होते, त्यादरम्यान खोदकाम करताना त्यांना अचानक धनलाभ झाला. परंतु त्यानंतर त्यांची एक चुक त्यांना इतकी महागात पडली की, ज्यामुळे त्यांना या पैशांचा लाभ घेताच आलंच नाही.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, धनलाभ झाल्यानंतर असं अचानक काय घडलं की, त्यांना या पैशांचं लाभ घेता आलं नाही?

तर या मागचं कारण आहे, जास्तीचा लोभ. होय या कामगारांनी लोभ केला, ज्यामुळे त्यांना थोडेफार जे काही पैसे मिळले ते देखील त्यांच्या हातचे निघून गेले.

लेबर गेट्स ट्रेझरकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण मंगळवारचे आहे. मंगळवारी मच्छलीशहर शहरातील कजियाना परिसरातील नूरजहाँची पत्नी इमाम अली रैनी यांच्या घरात शौचालयाचं काम सुरु होतं. ज्यासाठी खड्डा खोदण्याचं काम सुरु होतं. तेव्हा त्यांना सोन्याची नाणी भरलेला एक तांब्या सापडला, तांब्याच्या भांड्यात ही नाणी सापडल्याने कामगार आपापसात भांडू लागले. ज्यामुळे याबद्दल घरमालकाच्या मुलाल देखील यापैशांबद्दल कळालं.

त्यावेळी या मुलाने कामगारांकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. या कामगारांनी आम्हाला एकच नाणं मिळालं म्हणूण सांगितलं आणि ते या मालकाच्या मुलाला देऊन टाकलं.

त्यानंतर बुधवारी सायंकाळपर्यंत घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. प्रभारी निरीक्षकांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. पोलिसांनी कामगारांची चौकशी केली. कामगारांनी प्रथम अशा असं काही घडलं हे स्वीकारण्यासाठी नकार दिला. परंतु त्यानंतर कामगारांनी सोन्याची नाणी मिळाली असल्याची बातमी पोलिसांसमोर स्वीकारली.

मजुरांनी 9 सोन्याची नाणी पोलिसांना दिली आणि एक नाणे घरमालकाने दिले. एकूण 10 नाणी पोलिसांनी जप्त केली आहेत. तांब्याच्या लॉटमध्ये किती नाणी होती? ते अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु पोलीसांनी मिळालेलं सगळं सोनं जप्त केलं असल्याचं सांगण्यात येत आहे. कामगारांची आता चौकशी सुरू आहे.