भारतात सापडली सोन्याची खाण, जमिनीतून निघणार टनावारी सोनं

भारतातील जमिनीत दडलंय सोनं, पाहा देशात कुठे आढळली सोन्याची खाण

Updated: Feb 4, 2022, 11:25 PM IST
भारतात सापडली सोन्याची खाण, जमिनीतून निघणार टनावारी सोनं title=

राजस्थान :  भारतात परकीय आक्रमण होण्यापूर्वी सोन्याचा धूर निघत असे, असं बोललं जायचं. ते देशात असलेल्या सुबत्तेमुळे. मात्र भारतातील जमिनीत दडलेलं सोनं आतापर्यंत आढळलं नव्हतं. मात्र आता आपल्या देशालाही सोन्याची खाण सापडली आहे. 

राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातला कोटडी भागात सोन्याची खाण सापडली आहे.

भारतात सापडली सोन्याची खाण 
2008 साली मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशननं कोटडी भागात सर्वेक्षण केलं. आता त्याचा अहवाल आला असून जमिनीत सोनं आणि तांब्याचे मोठे साठे असल्याचं स्पष्ट झालं आहे.  जमिनीखाली 60 ते 160 मीटर आतमध्ये हा खजिना दडला आहे. या खाणीत 600 किलो सोनं आणि 250 टन तांब्याचे साठे असल्याचा अंदाज आहे. 

भूविज्ञान विभागानं या खाणीसाठी निविदा जारी केली आहे. त्यात ब्लॉकची किंमत 1 हजार 840 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे.  निविदेची बोली 128 कोटींपासून सुरू होईल. 

भीलवाडा जिल्ह्यात आशियातील सर्वात मोठ्या दोन खाणी आहेत. जगातील दुसरी आणि आशिया खंडातील सर्वात मोठी जस्ताची खाण जिल्ह्यातल्या आगूचा भागात आहे. त्यातच आता सोन्याची खाण मिळाल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा मोठा फायदा होईल, हे निश्चित.