नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग हळूहळू नियंत्रणात येत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक राज्य आपल्या परिनं प्रयत्न करत आहे. मास्क अनिवार्य असताना आता कार चालकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. कार चालवताना जे मास्क घालता किंवा घालत नाहीत त्यांच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे.
कारमध्ये मास्क वापरण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय आला आहे. या निर्णयानं काहीसा दिलासा मिळू शकतो. कारमध्ये जर तुम्ही एकटे असाल आणि कार चालवत असाल तर तुम्हाला मास्क लावणं बंधनकारक नाही. असा एक निर्णय घेण्यात आला आहे.
आता तुम्ही कारमधून एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला मास्क घालणं बंधनकारक नाही. या निर्णयानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शुक्रवारी झालेल्या दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (DDMA) बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय 7 फेब्रुवारीपासून 9वी ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 14 फेब्रुवारीपासून नर्सरीपासून 8वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हे दोन्ही महत्त्वपूर्ण राजधानी दिल्लीमध्ये घेण्यात आले आहेत. लसीकरण न झालेल्या शिक्षकांना शाळेत रूजू होण्याची परवनागी दिली जाणार नाही असंही यावेळी सांगण्यात आले आहे. कारमध्ये एकटं असाल तर मास्क वापरणं बंधनकारक नाही हे जरी दिल्लीसाठी लागू करण्यात आलं आहे.
दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत शाळा, जिम, स्विमिंग पूल, कोचिंग क्लासेस सुरू करण्याबाबत एकमत झालं आहे. दिल्लीमध्ये नाईट कर्फ्यू चालू राहणार आहे. राजधानी दिल्लीमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.