मुंबई : दिवसागणिक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. देशात कोरोना रुग्णांचा वाढणार आकडा चिंतेत भर टाकत आहे. कोरोनाबाधिक रुग्णांसाठी आता रेल्वेची मदत होणार आहे. कोविड-१९ रुग्णांसाठीची स्थानिक यंत्रणा कमी पडेल त्याठिकाणी या रेल्वे पाठवण्यात येतील,असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले.
रेल्वेने कोविड-१९ च्या रुग्णांसाठी पाच हजार २३१ विशेष डबे निर्माण केले आहेत. प्रत्येक डब्यात १६ रुग्णांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे प्रत्येक डब्यात १६ असे दहा डबे एका गाडीला जोडून आवश्यक त्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहेत, तशी माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे.
Indian Railways geared up to provide COVID Care Centers to State Authorities. Trains with unit composition of 10 coaches, with patient capacity of 16 per coach have been made ready. A total of 5231 coaches were modified to be used as Covid Care Center.
https://t.co/pqAGEiaHCp pic.twitter.com/JmqgsZ0oYn— Ministry of Railways (@RailMinIndia) June 11, 2020
तेलंगणाने कोविड-१९ रुग्णांच्या विलगीकरणासाठी तीन रेल्वेगाड्या मागवल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकारने या गाड्यांसाठी २४ विविध स्थानके निश्चित केली आहेत, तर दिल्लीत दहा रेल्वेगाड्यांमधून रुग्णांची सोय करण्यात येणार आहे. रुग्णांसाठीची स्थानिक यंत्रणा कमी पडेल त्याठिकाणी या रेल्वे पाठवण्यात येतील, असे रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केले.
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड सेंटर अनेक ठिकाणी उभारण्यात आली आहेत. काही ठिकाणी ही कोविड केंद्र कमी पडत आहेत. त्यामुळे आता रेल्वे त्याासाठी मदत करणार आहे. या गाड्यांसाठी रेल्वेने पाण्याची व्यवस्था असणारी ५८ स्थानके आणि पाणी तसेच चार्जिंगची सोय असणारी १५८ स्थानके निश्चित केली आहेत.
भारतीय रेल्वेने राज्य अधिकार्यांना कोविड केअर सेंटर उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. १० प्रशिक्षकांच्या युनिट कॉम्प्रोइझन आणि प्रत्येक प्रशिक्षकाची रुग्ण क्षमता १६ आहेत. कोविड केअर सेंटर म्हणून वापरण्यासाठी एकूण ५२३१ कोचेसमध्ये बदल करण्यात आले आहे.