कोरोना : गेल्या २४ तासांत ११ हजारांहून अधिक नवीन रुग्ण, मृत्यूचा आकडा धडकी भरवणारा

गेल्या २४ तासांत ११ हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर मृत्यूचा आकडा धडकी भरवणारा आहे.   

Updated: Jun 13, 2020, 11:39 AM IST
कोरोना : गेल्या २४ तासांत ११ हजारांहून अधिक नवीन रुग्ण, मृत्यूचा आकडा धडकी भरवणारा title=

मुंबई : कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत ११ हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर मृत्यूचा आकडा धडकी भरवणारा आहे. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. असेच आकडे वाढत राहिले तर भारत चौथा क्रमांकही मागे टाकेल अशी शक्यता आहे. देशात कोरोनाव्हायरसच्या संसर्गाची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. जूनच्या पहिल्या दिवसापासून, दररोज सरासरी सुमारे १०,००० प्रकरणे नोंदविली जात आहेत. शनिवारी गेल्या २४ तासांत ११००० पेक्षा जास्त संसर्ग झाल्याची घटना घडली आहे. 

शनिवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने  (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोना संसर्गाची ३,०८,९९३ प्रकरणे नोंदली गेली आहेत. दरम्यान, एक गोष्ट चांगली आहे की, १५४३३०रुग्ण बरे झाले आहेत आणि  ते घरी गेले आहेत. परंतु दुःखाची बाब म्हणजे आतापर्यंत ८८८४ लोकांचे बळी गेले आहेत.

गेल्या २४ तासात ११४५८ नवीन रुग्ण सापडले आहेत. यात ३८६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच बरे होण्याचे प्रमाण ४९.९४ टक्के आहे. जून महिन्यापासून संक्रमण खूप वेगाने पसरले आहे. याचा अंदाज लावला तर कोरोना इन्फेक्शनची संख्या अधिक वाढेल. १ जूनपर्यंत १९०५३५ रुग्ण होते. आता १३  दिवसानंतर हा आकडा तीन लाखांच्या पुढे गेला आहे. येथे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकार देशात प्रयोगशाळांची संख्या वाढवत आहे. काल २४ तासात १ लाख ४३ हजार ७३७ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आयसीएमआरनुसार आतापर्यंत देशात ५५ लाख ७ हजार १८२ नमुने चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

तेरा दिवसात सव्वा लाख रुग्ण वाढलेत. त्याचवेळी १ जूनपासून आतापर्यंत ३००० हून अधिक लोक मरण पावले आहेत. ही आकडेवारी केवळ धक्कादायकच नाही तर धडकी भरवणारी आहे. या नव्या आकडेवाडीवरुन असे दिसून येते की लोक  सोशल डिस्टेंसिंग गंभीरपणे पालन करीत नाहीत. यामुळे, कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. हे असेच होत राहिले तर जून महिन्याच्या अखेरीस देशात संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत हा आकडा १० लाखांच्या पुढे जाऊ शकतो.

महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली आहे. राज्यात कोरोना संसर्गाची प्रकरणे १०११४१ पर्यंत वाढली आहेत. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ३४९३ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकट्या मुंबईतच १३७२ नवीन प्रकरणांची नोंद झाली. गेल्या २४ तासांत १७१८ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ४७७९३ लोक या साथीने बरे झाले आहेत.

तामिळनाडूमध्ये कोरोना रूग्णांची संख्या ४० हजारांपर्यंत पोहोचली आहे. १८२८४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या २२०४७ लोकांना घरी पाठविण्यात आले आहे. राज्यात कोरोना संक्रमणामुळे ३६७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीतही कोरोनाचा धोका वाढत आहे. कोरोनामुळे संक्रमित लोकांची संख्या ३६ हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांत दिल्लीत विक्रमी २१३७३७ घटना घडल्या आहेत. दिल्लीत कोरोना रूग्णांची एकूण संख्या ३६८२४ वर गेली आहे. २२२१२ लोकांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. १३३९८ लोक बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत १२१४ लोकांचा मृत्यू झाला आहे.