Indian Railways कडून मोठी अपडेट; जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्यांना दिलासा , 'या' निर्णयाने प्रवासी खूश!

Indian Railways: जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. भारतीय रेल्वेने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवासीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. आतापासून तुम्हाला जनरल तिकिटातही रेल्वेमध्ये सीट मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

Updated: Jun 24, 2023, 02:57 PM IST
Indian Railways कडून मोठी अपडेट; जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्यांना दिलासा , 'या' निर्णयाने प्रवासी खूश! title=
Indian Railways General Ticket Rules

Indian Railways General Ticket : तुम्ही जर रेल्वेतून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची. तुम्ही जनरल तिकीट (Railways General Ticket) काढून प्रवास करत असाल तर आनंदाची बातमी आहे. रेल्वेने आता जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा देताना प्रत्येकाला ट्रेनमध्ये तिकीट आणि जागा सहज मिळणार आहे. आता यापुढे तुम्हाला जनरल तिकिटातही रेल्वेमध्ये सीट मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. भारतीय रेल्वेकडून सर्व वर्गांसाठी अनेक विशेष सुविधा पुरविल्या जात आहेत.

 तुम्हाला कसे मिळेल जनरल तिकीट ?

आता रेल्वेने अनारक्षित जनरल तिकीट बुक करण्यासाठी एक अ‍ॅप लॉन्च केले आहे. आता तुम्हाला सामान्य तिकिटांसाठीही लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही. अनेक वेळा तिकीट काउंटरच्या कमी संख्येमुळे प्रवाशांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते, तर अनेक वेळा त्यांची ट्रेनही चुकते आणि तिकीट मिळत नाही. 

प्रवाशांच्या अडचणी संपणार 

प्रवाशांच्या अडणीवर तोडगा काढण्यात येत आहे. जनरल तिकीट (Railways General Ticket) मिळण्याच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रेल्वेने एक नवीन अ‍ॅप लाँच केले असून, त्याद्वारे तुमची ही समस्या पूर्णपणे संणार आहे. 

तुम्ही नोंदणी कशी करु शकता?

तुम्ही हे अ‍ॅप तुमच्या फोनवर डाऊनलोड करु शकता. यानंतर तुम्ही नोंदणी करु शकता. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि इतर सर्व तपशील भरावे लागतील. आता यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल, तो तुम्हाला भरावा लागेल. या बदल्यात तुमची नोंदणी केली जाईल.

तिकीट बुकिंगवर बोनस  

जर तुम्ही या रेल्वेच्या अ‍ॅपद्वारे ट्रेनचे तिकीट बुक केले तर तुम्हाला बोनस देखील मिळेल. यासोबतच यावेळी तुम्हाला 15 रुपयांऐवजी 30 रुपये खर्च करावे लागतील. या अ‍ॅपद्वारे तुम्ही स्वस्तात तिकीट बुक करु शकता. यासाठी तुम्हाला आर वॉलेटमधून पैसे द्यावे लागतील. 

जनरल तिकिटाचे महत्त्वाचे नियम

याशिवाय जनरल तिकिटाच्या नियमांबद्दल (Railways General Ticket) बोलायचे झाले तर ते दोन भागात विभागले आहे. ही वेळ अंतरानुसार असायची. जर एखाद्याला रेल्वेने 199 किलोमीटरचा प्रवास करायचा असेल, तर तिकिटाचा नियम असा आहे की, तिकिट खरेदी केल्यानंतर 180 मिनिटांच्या आत रेल्वेमध्ये चढावे लागेल. दुसरीकडे, जर एखाद्याला 200 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करायचा असेल तर तो 3 दिवस अगोदर सामान्य तिकीट खरेदी करु शकतो असा नियम आहे.