रेल्वेच्या तात्काळ तिकिटाच्या नियमांमध्ये मोठा बदल

रेल्वेने तात्काळ तिकिटांच्या नियमांमध्ये मोठा बदल केलेला आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Nov 29, 2017, 04:20 PM IST
रेल्वेच्या तात्काळ तिकिटाच्या नियमांमध्ये मोठा बदल title=

नवी दिल्ली : रेल्वेने तात्काळ तिकिटांच्या नियमांमध्ये मोठा बदल केलेला आहे. 

नव्या नियमांना लवकरच लागू करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशन आणि रेल्वे बोर्डामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आता यानंतर रेल्वेतील ५६  हजार कर्मचारी तात्काळ तिकिट घेऊ शकतात. आतापर्यंत ही सुविधा फक्त सामान्य नागरिकांसाठी होती पण आता ही कर्मचाऱ्यांसाठी देखील खुली झाली आहे. तुर्तास ही सेवा जबलपूरमध्ये आहे. 

या संदर्भात रेल्वेकडून लवकरच आदेश निघणार आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या युनियनमार्फत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी देखील तात्काळ तिकिट असावं असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. भरपूर चर्चा झाल्यानंतर हा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावामुळे आता सामान्यांसोबतच रेल्वे कर्मचाऱ्यांना देखील फायदा होणार आहे. या सेवेमुळे रेल्वे कर्मचारी कमी कालावधीत बाहेर जाण्याचा प्लान करू शकतात. या निर्णयामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे कुटुंबिय देखील खूश झाले आहेत. 

असा मिळेल लाभ 

तात्काळ तिकिटासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना देखील पास घेऊन लांब रांगेत उभं राहावं लागणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना त्याच वेळी तात्काळ तिकिटाचे पैसे द्यावे लागणार. या निर्णयाचा फायदा भोपाळमधील १८ हजार कर्मचारी लाभान्वित आहेत.