चार्ट तयार झाल्यानंतरही रद्द केलेल्या रेल्वे तिकिटाचे पैसे मिळतील परत; IRCTC ने सांगितला पर्याय

Indian Railways:जर तुम्हाला कोणत्याही अडचणीच्या परिस्थितीत ट्रेन तिकीट रद्द करावे लागले आणि ट्रेनचा चार्ट तयार झाला गेला असेल, तरीही तुम्ही रिफंडसाठी अर्ज करू शकता.   

Updated: Feb 27, 2022, 03:39 PM IST
चार्ट तयार झाल्यानंतरही रद्द केलेल्या रेल्वे तिकिटाचे पैसे मिळतील परत; IRCTC ने सांगितला पर्याय title=

मुंबई Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आजच्या युगात, भारतात दररोज करोडो लोक रेल्वेने प्रवास करतात, त्यामुळे रेल्वेशी संबंधित अपडेट्सची माहिती असणे आवश्यक आहे. अनेक वेळा अचानक काही अडचणी निर्माण होतात त्यामुळे ट्रेनचा चार्ट तयार केल्यानंतरही तुम्हाला ट्रेनचे तिकीट रद्द करावे लागते.

परंतू, तुम्हालाही तिकीट रद्द केल्याचा रिफंड मिळू शकतो. ही माहिती देताना भारतीय रेल्वेने सांगितले की, चार्ट तयार झाल्यानंतरही तुम्ही काही कारणास्तव ट्रेनचे तिकीट रद्द केले तरीही तुम्हाला रिफंडचा दावा करता येतो.

IRCTC ची मोठी माहिती

IRCTC ने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आणि म्हटले की  रेल्वे प्रवास न करता तिकीट रद्द केल्यास रिफंड मिळू शकतो. यासाठी तुम्हाला रेल्वेच्या नियमांनुसार तिकीट जमा पावती (टीडीआर) जमा करावा लागेल.

ऑनलाइन टीडीआर कसा दाखल करावा

  • यासाठी तुम्ही प्रथम IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या (www.irctc.co.in)
  • आता होम पेजवर जा आणि My Account वर क्लिक करा
  • आता ड्रॉप डाउन मेनूवर जा आणि My transaction वर क्लिक करा.
  • - येथे तुम्ही फाइल टीडीआर पर्यायातील एक पर्याय निवडून फाइल टीडीआर करू शकता.
  • आता तुम्हाला त्या व्यक्तीची माहिती दिसेल ज्याच्या नावावर तिकीट बुक केले आहे.
  • आता येथे तुम्ही तुमचा पीएनआर क्रमांक, ट्रेन क्रमांक आणि कॅप्चा भरा आणि रद्द करण्याच्या नियमांच्या बॉक्सवर टिक करा.
  • आता तुम्ही सबमिट बटणावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला बुकिंगच्या वेळी फॉर्ममध्ये दिलेल्या नंबरवर एक OTP मिळेल.
  • येथे OTP टाकल्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
  • PNR तपशील सत्यापित करा आणि तिकीट रद्द करा पर्यायावर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला पृष्ठावर रिफंडची रक्कम दिसेल.
  • बुकिंग फॉर्मवर दिलेल्या नंबरवर, तुम्हाला पीएनआर आणि रिफंडचे तपशील असलेला एक कन्फर्मेशन संदेश मिळेल.

Indian Railways, Indian Railways Update, Indian Railways Latest News, IRCTC News, Indian Railways News, Indian Railways Rules, Indian Railways Refund,