Holi Special trains cancelled: महाराष्ट्रासह देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी लाखो प्रवासी शहरातून गावाकडे जातात. होळीच्या सणापूर्वीच रेल्वे तिकीट मिळवण्यासाठी स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. प्रवाशांची गर्दी पाहता अनेक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णयही रेल्वेने घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वेने 50 टक्के अधिक होळी स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. पण आता रेल्वे प्रवाशांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.
गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी वाढवणारा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आलाय. 18 मार्च ते 22 मार्च दरम्यान रेल्वेने यापैकी काही मार्गावरील अनेक गाड्या रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.
तुम्हीदेखील होळीसाठी तिकीट काढायच्या विचारात असाल तर थोडं थांबा. कोणत्या ट्रेन रद्द झाल्या आहेत याची माहिती घ्या अन्यथा तुम्हाला मनस्तापाला सामोरे जावे लागू शकते. गुजरात, राजस्थानकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल झाला असला तरी मुंबई, महाराष्ट्रातील प्रवाशांवर परिणाम करणाऱ्या वेळापत्रकाची माहिती घेऊया.
अहमदाबादमधील गांधीधाम ते गांधीधाम केबिनमधील नॉन-इंटरलॉकिंग कामामुळे, 19 मार्च 2024 ते 22 मार्च 2024 या कालावधीत ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे गांधीधामकडे येणाऱ्या/जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम होईल. प्रवाशांवर याचा ताण पडणार आहे.
21 मार्चच्या गाडी क्रमांक 09416 गांधीधाम-वांद्रे टर्मिनस स्पेशल, ट्रेन क्रमांक 09415 वांद्रे टर्मिनस-गांधीधाम स्पेशल, गाडी क्रमांक 22952 गांधीधाम-वांद्रे टर्मिनस एक्सप्रेस आणि 22 मार्चची ट्रेन क्रमांक 22951 वांद्रे टर्मिनस-गांधीधाम एक्सप्रेस
18 मार्च 2024 पुण्यावरुन सुटणारी ट्रेन क्रमांक 11092 पुणे-भुज एक्स्प्रेस ट्रेन अहमदाबाद स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट झाली. तर अहमदाबाद आणि भुज दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली.
20 मार्च 2024 रोजी भुज येथून निघणारी ट्रेन क्रमांक 11091 भुज-पुणे एक्स्प्रेस अंशतः रद्द करण्यात आली आहे.
पुढील गाड्यांचा मार्ग बदलला आहे. या गाड्या गांधीधाम स्टेशनवर जाणार नाहीत. या गाड्यांव्यतिरिक्त सर्व गाड्या आपला निर्धारित मार्ग केबनि-गांधीधाम-आदिपूर या मार्गावरुन जाताना गांधीधाम केबिन-आदिपूर मार्गावर थांबतील.
20 आणि 21 मार्च 2024 रोजी वांद्रे टर्मिनस-भुज एक्स्प्रेस क्रमांक 22955
20 मार्च 2024 रोजी ट्रेन क्रमांक 14321 बरेली-भुज एक्सप्रेस
20 मार्च 2024 रोजी वांद्रे टर्मिनस-भुज एक्स्प्रेस क्रमांक 22903
21 मार्च 2024 रोजी गाडी क्रमांक 20907 दादर-भुज एक्सप्रेस
21 मार्च 2024 रोजी ट्रेन क्रमांक 14311 बरेली-भुज एक्सप्रेस
21 मार्च 2024 रोजी ट्रेन क्रमांक 22904 भुज-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस
21 मार्च 2024 रोजी ट्रेन क्रमांक 14322 भुज-बरेली एक्सप्रेस
21 मार्च 2024 रोजी ट्रेन क्रमांक 22956 भुज-वांद्रे टर्मिनस एक्सप्रेस
21 मार्च 2024 रोजी ट्रेन क्रमांक 22908 भुज-दादर एक्स्प्रेस
22 मार्च 2024 रोजी ट्रेन क्रमांक 14312 भुज-बरेली एक्सप्रेस
तुम्हीदेखील या मार्गावर प्रवासाचे नियोजन केले असेल तर घराबाहेर पडण्यापुर्वी वेळापत्रकावर नजर टाका.