IRCTC तत्काळ तिकीट बुक करताना 'या' पर्यायावर क्लिक करा, लगेच होईल Reservation

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तिकीट बुकिंगही तुमच्यासाठी खूप सोपे होईल. 

Updated: Jul 5, 2022, 05:47 PM IST
IRCTC तत्काळ तिकीट बुक करताना 'या' पर्यायावर क्लिक करा, लगेच होईल Reservation title=

मुंबई : रेल्वेचे तिकीट हे खूपच स्वस्त असल्यामुळे ते सगळ्यांच्या खिशाला परवडणारे असते. त्यामुळे बहुतांश लोक रेल्वे तिकीट बुक करतात. परंतु यामुळे होतं काय की, लोकांना रीजर्वेशन तिकीट मिळण्यात अडचण होते. जर तुम्हाला कन्फर्म तिकीट काढायचं असेल, तर तुम्हाला दोन ते तीन महिने आधी तिकीट काढावी लागते. त्यानंतर जर तुम्ही तिकीट काढले तर कनफर्म तिकीट मिळत नाही. अशा परिस्थितीत, अनेक वेळा तत्काळ तिकिटाचा पर्याय निवडण्याची सक्ती असते.

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तिकीट बुकिंगही तुमच्यासाठी खूप सोपे होईल. तत्काळ तिकीट बुक करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

एक गोष्ट जाणून घ्या की तत्काळ तिकीट बुकिंग दरम्यान वेळेची भूमिका सर्वात महत्वाची असते. जर तुम्हाला काही सेकंद जरी उशीर केलात, तर तुम्हाला तिकीट मिळणार नाही. पण तुमची वेळ अचूक असेल तर तुम्हाला तिकीट नक्की मिळेल. त्यामुळे तिकीट बुकिंग सुरू होण्यापूर्वी काही गोष्टी पूर्ण कराव्यात.

तत्काळ तिकीट बुकिंग सुरू करण्यापूर्वी, तुम्ही IRCTC ला लॉग इन करून बसावे.

AC तत्काळ तिकीट बुकिंग सेवा सकाळी 10 पासून सुरू होते. तर स्लीपर क्लाससाठी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होते. बुकिंग करण्यासाठी तुम्हाला आगाऊ लॉग इन करावे लागेल. म्हणून, AC तत्काळ तिकीट बुकिंगसाठी, तुम्हाला फक्त 9.58 वाजता लॉग इन करावे लागेल. तर स्लीपर क्लाससाठी तुम्हाला 10.58 वाजता लॉग इन करावे लागेल. येथे गेल्यानंतर, तुम्ही MyProfile वर जाऊन आधीच एक मास्टर लिस्ट बनवायला हवी.

मास्टर लिस्ट बनवण्याचा थेट उद्देश हा आहे की, तत्काळ तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा सगळी माहिती भरण्याची गरज नाही. यासगळ्यामुळे तुमचा वेळ वाचणार आहे आणि तुम्हाला लवकर तिकीट मिळण्यासाठी होईल मदत.

मास्टर लिस्ट बनवल्यानंतर तुम्हाला ट्रॅव्हल लिस्ट बनवावी लागेल. बुकिंग सुरू झाल्यावर, तुम्ही कोणतेही तपशील न टाकता थेट मास्टर लिस्ट निवडू शकता. मास्टर लिस्टमध्ये तुम्हाला प्रवासाची यादी दिसेल. शेवटी तुम्हाला पेमेंटचा पर्याय दिला जातो. पेमेंटसाठी तुम्ही कार्ड आणि UPI पेमेंट दोन्ही वापरू शकता आणि बस, तुमचं तिकीट झालं बुक.