Mukesh Ambani: अतिश्रीमंत मुकेश अंबानींना आवडतात स्ट्रीटवरचे 'हे' खाद्यपदार्थ

अंबानी कुटुंबियांचे नावं हे कायमच चर्चेत असते. त्यांच्या घरात सध्या लगीनघाई सुरू आहे त्यामुळे अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांच्या साखरपुड्याचे फोटो जोरदार इंटरनेटवर व्हायरल झाले होते.

Updated: Feb 12, 2023, 05:02 PM IST
Mukesh Ambani: अतिश्रीमंत मुकेश अंबानींना आवडतात स्ट्रीटवरचे 'हे' खाद्यपदार्थ  title=

Mukesh Ambani Street Food: अंबानी कुटुंबियांचे नावं समोर आले की आपल्या डोळ्यासमोर श्रीमंतीचा थाट येतो. त्यांना साध्या गोष्टींची सवयचं नसेल असेच आपल्याला वाटेल परंतु जगातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना तुमच्या-आमच्यासारखेच स्ट्रीट फूड खूपच आवडते. तुम्हालाही हे ऐकून जरासे आश्चर्य वाटले असेल परंतु तेही स्ट्रीट फूडचे (Street Food) शौकीन आहेत. मुकेश अंबानींचे नावं घेतले की आपल्या मनात हेच येते की मुकेश अंबानी आहेत ते... ते काही साध्या रेस्टोरंटमध्ये जाणारच नाहीत. त्यांच्यासाठी फाय स्टार्सच काय सेव्हन स्टार हॉटेलही कमी पडेल. पण तुम्हाला हे जाणून नक्कीच आश्चर्य वाटले असेल की त्यांनाही स्ट्रीट फूड आवडते? तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की नक्की त्यांना स्ट्रीट फूडचे कोणकोणते पदार्थ आवडतात. (indian business magnet mukesh ambani likes eating street food rather than having meal at high five restuarants)

अंबानी कुटुंबियांचे नावं हे कायमच चर्चेत असते. त्यांच्या घरात सध्या लगीनघाई सुरू आहे त्यामुळे अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांच्या साखरपुड्याचे फोटो जोरदार इंटरनेटवर व्हायरल झाले होते. मुकेश अंबानी आणि नीतू अंबानीप्रमाणे त्यांची मुलंही लोकांच्या चर्चेत असतात. मध्यंतरी अंबानींची लेक ईशा अंबानी ही आपल्या दोन जुळ्या मुलांसह मुंबईला आली होती. 

सध्या अंबानी कुटुंबीय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मुकेश अंबानी यांना कोणतं स्ट्रीट फूड आवडतं? याची चर्चा सुरू झाली आहे. अनेकांना असं वाटलं की, अंबानी मुंबईत राहतात म्हणजे त्यांना वडा पाव जास्त आवडतं असेल परंतु त्यांना रस्त्यावरची भेळपूरी आणि बटाटापुरी खायला आवडते. त्याचसोबत त्यांना महागड्या हॉटेलपेक्षा साधं जेवणही जेवायला आवडतं. त्याचसोबत त्यांना जास्त स्टाईलिश किंवा लक्झरीयसही जगायला आवडतं नाही तर त्यांना अगदी साधं राहणीमानं आवडते. 

मुकेश अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैंकी (Richest People In the World) एक आहेत. तरीही त्यांना साधं राहणीमान आवडते. त्यांना आपल्या परिवारासोबत वेळ खायला आवडतं. त्याचसोबत त्यांना खाण्यापिण्याची बऱ्याच गोष्टी आवडतात. मुकेश अंबानी यांना आपल्या मुलांसोबत वेळ घालवायला आवडतो. सध्या अंबानी कुटुंबियांमध्ये लगीनघाई सुरू आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची तयारी सुरू आहे. नुकत्याच त्यांचा साखरपूडा संपन्न झाला त्यांच्या साखरपुड्याला दिग्गज मंडंळींनी हजेरी लावली होती. यावेळी अनंत अंबानीही त्याच्या स्थूलपणावर ट्रोल झाला होता. राधिका मर्चंटलाही यावेळी ट्रोलर्सच्या निशाण्यावर राहावे लागले होते. परंतु अनेकांनी तिचे आणि तिच्या सौंदर्याचे कौतुकही केले.