सैन्य दिनाच्या संचलनाचं नेतृत्व करणाऱ्या तान्या शेरगिल यांचीच सर्वदूर चर्चा

#ArmyDayनिमित्ताने पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात पाहायला मिळाला त्यांचा अंदाज 

Updated: Jan 15, 2020, 07:46 PM IST
सैन्य दिनाच्या संचलनाचं नेतृत्व करणाऱ्या तान्या शेरगिल यांचीच सर्वदूर चर्चा  title=
सैन्य दिनाच्या संचलनाचं नेतृत्व करणाऱ्या तान्या शेरगिल यांचीच सर्वदूर चर्चा

नवी दिल्ली : Army Day अर्थात सैन्य दिनाच्या निमित्ताने दिल्लीत एक दिमाखदार सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी चीफ ऑफ डिफेन्सपदी म्हणजेच देशाच्या संरक्षण प्रमुख पदी नियुक्ती झालेल्या जनरल बिपीन रावत आणि लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी उपस्थिती लावली होती. या वेळी लष्कर प्रमुखांनी काही जवानांना सन्मानितही केलं. 

यंदाचा म्हणजेच २०२० या वर्षाचा सैन्य दिन आणखी एका कारणामुळे खास होता. हे कारण म्हणजे यंदाच्या वर्षी प्रथमच एक महिला अधिकारी परेड ऍडजडेंटच्या रुपात सहभागी झाल्या होत्या. ज्यांनी सर्व संचलनादरम्यान पुरुषांच्या सैन्यदल तुकड्यांचंही नेतृत्त्व केलं. सैन्य दिनाच्या निमित्ताने संचलनाचं नेतृत्व करण्यासाठी निवड होणाऱ्या या महिला अधिकारी आहेत, कॅप्टन तान्या शेरगिल Tanya Shegill.  

मार्च २०१७ मध्ये चेन्नईतील ऑफसर्स ट्रेनिंग अकॅडमीतून त्यांनी कमिशन घेतलं. ज्यानंतर त्या सैन्यदलातील सिग्नल्स कॉर्प तुकडीत तैनात झाल्या. इलेक्ट्रॉनिक्स एँड कम्युनिकेशन्समध्ये त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. शेरगिल यांचे वडिलही सैन्यात कार्यरत होते. १०१ मीडियम रेजिमेंटमध्ये राहत त्यांनी देशाची सेवा केली. तर, तान्या शेरगिल यांचे आजोबा आर्म्ड रेजिमेंट आणि पणजोबा शीख रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. 

प्रजासत्ताक दिनी भावना कस्तुरी यांनी सांभाळली होती संचलनाच्या नेतृत्वाची धुरा 

मागील वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पार पडलेल्या संचलनामध्येही पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्यांचं नेतृत्त्व पाहायला मिळालं. महिला अधिकारी भावना कस्तुरी यांनी अतिशय सुरेख रित्या संचलनाचं नेतृत्व सांभाळलं होतं.