भारताकडून 'अस्त्र' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारतीय वायू दलाच्या 'सुखोई ३०' या अत्याधुनिक विमानातून यशस्वी चाचणी केली आहे.

Updated: Sep 18, 2019, 10:56 AM IST
भारताकडून 'अस्त्र' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी title=

नवी दिल्ली : ताशी ५ हजार ५५५ किलोमीटर वेगाने लक्षाच्या दिशेने झेपावणाऱ्या 'अस्त्र' या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. भारतीय संशोधन आणि संरक्षण संस्थेने (डीआरडीओ) 'अस्त्र' हे क्षेपणास्त्र विकसित केले असून, भारतीय वायू दलाच्या 'सुखोई ३०' या अत्याधुनिक विमानातून यशस्वी चाचणी केली आहे. यावेळी 'अस्त्र' क्षेपणास्त्राने हवेतील लक्षाच्या अचूक वेध घेतला. 

या क्षेपणास्त्राचे वैशिष्ठ्य म्हणजे, ७० किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त आंतरावरून लक्ष भेदण्याची क्षमता यात आहे. सुमारे पंधरा किलोची स्फोटके वाहून नेण्याची क्षमता 'अस्त्र'मध्ये आहे. तर भविष्यात अस्त्रचा पल्ला वाढवून ३०० किलोमीटर करण्यात येणार असल्याचे डिआरडीओकडून सांगण्यात आले आहे.

भारताची अर्थव्यवस्था २०३०-३१ पर्यंत १० ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे भारत सरकारचे उद्दीष्ट असल्याचे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. भारतीय अर्थव्यवस्था सध्या २ पुर्णांक ३ ट्रिलियन डॉलर इतकी असून, २०२४ पर्यंत ती ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असल्याचेही राजनाथ सिंह म्हणाले.