School Curriculum : शाळा-महाविद्यालयात विद्यार्थ्यांना इतिहासाच्या पुस्तकात (History Book) आता अकबर किंवा सिकंदरचा (Akbar-Sikandar) इतिहास शिकवला जाणार नाही. तर चंद्रगुप्त (Chandragupta) आणि महाराणा प्रताप (Maharana Paratap) यांच्या शौर्यगाथा सांगितल्या जाणार आहेत. इतिहासाच्या पुस्तकात बदल करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुस्तकात आता महाराणा प्रताप महान असल्याचं लिहिलं जाणार आहे. चंद्रगुप्त यांच्या शौर्याचे दाखले दिले जाणार आहेत. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यात लवकरच इतिहासाच्या पुस्तकात हे बदल केले जाणार आहेत. मध्यप्रदेशचे शिक्षण मंत्री इंदर सिंह परमार (Inder Singh Parmar) यांनी नव्या बदलाची घोषणा केली आहे. वस्तुस्थितीच्या आधारे शालेय आणि महाविद्यालयीन पुस्तकांमध्ये समावेश केला जाणार असल्याचं इंदर सिंह परमान यांनी सांगितलं.
राज्यातील भाजप कार्यकर्ता परिषदेला संबोधित करताना खासदार आणि शिक्षणमंत्री इंदरसिंग परमार यांनी शाळा-महाविद्यालयांच्या इतिहासाच्या पुस्तकांतून अकबर-सिकंदर यांची नावे काढून महाराणा प्रताप, चंद्र गुप्ता आणि विक्रमादित्य यांच्याविषयी माहिती दिली जाणार असल्याचं सांगितलं. त्यांनी पुस्तकांमध्ये बदल करण्याची घोषणा केली.
चुकीचा इतिहास शिकवला जात आहे : शिक्षणमंत्री
इंग्रजांनी आपल्या देशातील 7 लाख शाळा-महाविद्यालये बंद केली होती, ब्रिटीश राजवटीत आपल्या पूर्वजांना अशिक्षित म्हणत अपमानित करण्यात आलं होतं, इतिहासाच्या पानांवर आपल्या पूर्वजांचं वर्णन दरोडेखोर आणि गुन्हेगार म्हणून करण्यात आलं होते, चुकीचा इतिहास शिकवला गेला होता. त्यामुळे आता बदल महत्त्वाचं असल्याचं इंदर सिंह परमान यांनी म्हटलंय.
शिक्षण व्यवस्थेत बदल होतोय
काँग्रेसने गेली 70 वर्षे चुकीच्या तथ्यांच्या आधारे तोच इतिहास शिकण्याचं काम केलं आहे. आता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली चार वर्षांच्या विचारमंथनानंतर 2020 मध्ये संपूर्ण शिक्षण व्यवस्था बदलण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. इतिहासात दुरुस्ती करण्याची आता वेळ आली आहे. इतिहासाच्या पानांवर आक्रमण करणारा महान लिहिला जाणार नाही, इतिहासाच्या पानांवर लुटारू महान लिहिला जाणार नाही, आता इतिहासाच्या पानांवर फक्त महाराणा प्रताप महान लिहिलं जाईल, इतिहासाच्या पानांवर विक्रमादित्य महान लिहिलं जाईल. , चंद्रगुप्त महान लिहिलं जाईल, अलेक्झांडर द ग्रेट. असे होणार नाही, अकबर महान होणार नाही, असंही इंदर सिंह परमार यांनी सांगितलं.
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही इतिहासाच्या पुस्तकात बदल केले जाणार असल्याचं सांगितलं होतं. आपला इतिहास केवळ मुघलांशी संबंधित नाही. तर त्यात अनेक तथ्ये आहेत ज्याबद्दल आपल्याला माहिती नाही. म्हणून, आपण आपल्या मुलांनाही त्याबद्दल शिकवणं गरजेचं आहे, असं धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं होतं.
आपला इतिहास अजूनही मॅकॉले व्यवस्थेच्या षडयंत्रात अडकलेला आहे, जो आपल्याला बदलावा लागेल, असं प्रधान यांनी सांगितलं. इराणमध्येही भारताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची पुस्तकं अनुवादित करुन वाचली जातात. आपल्या देशातील काही लोक 21 व्या शतकातही मॅकॉले पद्धतीनुसार जगत आहेत. पण आपला भारत हा लोकशाही देश आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या शैक्षणिक धोरणात आवश्यक ते बदल करण्याचा पूर्ण अधिकार आहे.