मुंबई : जपानच्या इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भुषवणाऱ्या शिंजो आबे (shinzo abe) यांचे निधन झाले. शिंजो आबे यांच्यावर हल्ला झाला असून छातीवर गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी भारतासोबत अनेक क्षेत्रात भागिदारी वाढवली. आबे यांच्यावरील हल्ल्याने जग हादरले असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील गहिवरले.
पंतप्रधान झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनी नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) सप्टेंबर 2014 मध्ये जपानला भेट दिली. मोदी आणि आबे यांनी द्विपक्षीय संबंधांना "Special Strategic and Global Partnership" मध्ये अपग्रेड केले. नागरी अणुऊर्जेपासून ते सागरी सुरक्षेपर्यंत, बुलेट ट्रेन ते दर्जेदार पायाभूत सुविधांपर्यंत, ऍक्ट ईस्ट पॉलिसी ते इंडो-पॅसिफिक रणनीती अशा अनेक मुद्द्यांचा समावेश नवीन संबंधांमध्ये आहे.