रामभक्तांसाठी IRCTCचं 'द रामायण सागा' टूर पॅकेज, थेट लंकेत पर्यटन... जाणून घ्या भाडे आणि तारीख

Ramayan Saga Tour Package : अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दररोज लाखो रामभक्त रामलल्लाचं दर्शन घेत आहेत. देश-विदेशातून अनेकजण अयोध्येत येत आहेत. आहेत आता भारतीय रेल्वेने रामभक्तांसाठी आणखी एक घोषणा केली आहे. 

राजीव कासले | Updated: Feb 5, 2024, 04:40 PM IST
रामभक्तांसाठी IRCTCचं 'द रामायण सागा' टूर पॅकेज, थेट लंकेत पर्यटन... जाणून घ्या भाडे आणि तारीख title=

Ramayan Saga Tour Package : 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते अयोध्येत रामल्लाची राममंदिरात प्राण प्रतिष्ठा झाली. त्यानंतर 23 जानेवारीपासून रामभक्तांसाठी रामलल्लाचं दर्शन खुलं करण्यात आलं. दररोज सुमारे दोन ते तीन लाख भाविक अयोध्येत (Ayodhya) दाखल होतायत. गेल्या चौदा दिवसात अयोध्येत दहा लाखाहून अधिक भाविकांनी हजेरी लावली आहे. दानपेटीतही लाखो रुपये जमा झाले आहेत. 

आता देशातील रामभक्तांसाठी भारतीय रेल्वेने एक मोठी घोषणा केली आहे. रामायणाशी जोडल्या गेलेल्या ठिकाणी रामभक्तांना पर्यटन (Tourism) घडवून आणलं जाणार आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ ते श्रीलंका दरम्यान आलिशान हवाई टूर पॅकेज लाँच करण्यात आलं आहे. IRCTC च्या लखनऊ कार्यालयाने लखनौ ते श्रीलंका हे 07 दिवस आणि 06 रात्रीचे टूर पॅकेज रामभक्तांसाठी आणलं आहे. हे टूर पॅकेज 09 मार्च 2024 ते 15 मार्च 2024 पर्यंत असणार आहे. 

या ठिकाणचं पर्यटन
आयआरसीटीसीने या पॅकेजला 'द रामायण सागा' टूर पॅकेज  (The Ramayan Saga) असं नाव दिलं आहे. या पॅकेजमध्ये कोलम्बोतलं मुनेश्वरम मंदिर, मनावरीतलं राम मंदिर आणि स्पाईस गार्डन, रम्बोडा वॉटर फॉल, टी गार्डन, न्यूआरा एलियातील सीता अम्मा मंदिर, अशोक वाटिका, ग्रेगरी लेक, दिवरुपम्पोला मंदिर (सीता अग्नि परीक्षा ठिकाण) कोलम्बो, कॅण्डी आणि न्यूआरा ऐलिया या ठिकाणचं पर्यटन आयआरसीटीसीद्वारे घडवलं जाणार आहे. 

किती भाडे असणार 
या पॅकेजमध्ये तीन जणांसाठी 71000 हजार रुपेय प्रतीव्यक्ती असं भाडं आकारलं जाणार आहे. तर दोन व्यक्तींना एकत्र राहायचं असेल तर 72200 रुपयांचं पॅकेज असणार आहे. केवळ एका व्यक्तिला प्रवास करायचा असेल तर 88800 रुपये भाडं असणार आहे. आई-वडिलांबरोबर प्रवास करणाऱ्या मुलासाठी खास पॅकेज असणार आहे. त्यांच्यासाठी 57300 रुपये (बे सहित) आणि 54800 (बेड सुविधा नाही) प्रती व्यक्ती असणार आहे. 

अशी करा बुकिंग
'द रामायण सागा' टूर पॅकेजसाठी प्रथम येणाऱ्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी पर्यटन भवन, गोमती नगर, लखनऊ आणि कानपूरमधल्या आयआरसीटीसी कार्यालय याठिकाणी नोंदणी करता येईल. तसंच आयआरसीटीसीची वेबसाईट  www.irctctourism.com यावरही ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. 

या पॅकेजची अधिक माहिती घेण्यासाठी खाली दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधू शकता
लखनऊ- 8287930922/8287930902
कानपुर-8287930930, 828793...