नवी दिल्ली : लडाखजवळील गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमधील संघर्ष आणि तेथे गेलेल्या 20 भारतीय सैनिकांच्या जीव यामुळे तणाव वाढला आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाचं वातावरण आहे आणि त्याचा परिणाम आता सरकारच्या कामांवर देखील दिसून येत आहे. चायनाने अनेक प्रसंगी देशाची फसवणूक केली आहे, अशा परिस्थितीत सरकार किंवा सैन्य शांत बसणार नाही. चीनला योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी चारही बाजुने घेरलं जाईल.
गलवान खोऱ्यात करारानुसार, जेव्हा चीनी सैन्याने परत जाण्यास नकार दिला तेव्हा दोन देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला. यात 20 भारतीय जवान शहीद झाले, तर चीनचेही मोठे नुकसान झाले. यानंतर थोडी शांतता आहे. पण चीनने अद्याप सैन्य मागे घेतलेलं नाही.
आता लडाख सीमेजवळच नाही तर संपूर्ण सीमेवर सैन्य सतर्क आहे. उत्तराखंडमधील चीनच्या सीमेसह संपूर्ण वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) सैन्याच्या सतर्कतेत वाढ करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त मोठ्या संख्येने लष्कराचे ट्रक लडाख सीमेजवळ जाताना दिसले आहेत.
लडाखमध्ये रस्ता बांधणीला वेग
लडाखमध्ये भारत बांधत असलेल्या रस्त्याचा वेगही वाढविण्यात आला आहे. भारताच्या या रस्ता बांधकामाला चीनचा विरोध होता. कारण त्यानंतर भारतीय लष्कराला सीमेवर जाणे सोपे होईल. जे चीनला नको आहे.
परंतु ताणतणावा असूनही रस्ता बांधकाम चालूच ठेवण्याचे भारताने ठरविले नाही. तर या कामाला गती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सुमारे 1500 मजूरही यासाठी लडाखला रवाना झाले आहेत. लॉकडाऊनच्या वेळी काही कामगार परत आले होते, पण आता त्यांना परत पाठविण्यात आले आहे.