Cyclone Biparjoy Updates : अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळाची निर्मिती प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र, अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईपासून अवघ्या 910 किलोमीट अंतरावरुन पुढे सरकले आहे. त्यामुळे मुंबईवरचा धोका टळला आहे. पुढील 48 तासात हे वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. हे वादळ पाकिस्तानकडे जाताना गुजरात किनाऱ्याला धोका निर्माण करु शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान वादळामुळे समुद्रात 8 मिटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना किनाऱ्यावर परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
चक्रीवादळ 'बिपरजॉय' वेगाने तीव्र चक्रीवादळात रुपांतरित होत आहे आणि पुढील 48 तासांत ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुरुवारी सांगितले. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, चक्रीवादळ पुढील तीन दिवसांत उत्तर-वायव्य दिशेने सरकणार आहे. तथापि, भारत, ओमान, इराण आणि पाकिस्तानसह अरबी समुद्राला लागून असलेल्या देशांवर कोणताही मोठा परिणाम होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागने वर्तविलेला नाही. माक्ष, बिपरजॉय चक्रीवादळ शुक्रवारपासून गुजरातमध्ये धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
IMD ने बुधवारी रात्री आपल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, चक्रीवादळ बिपरजॉय पूर्व-मध्य आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर आहे. गोव्याच्या पश्चिम-नैऋत्येस सुमारे 870 किमी आणि मुंबईच्या दक्षिण-पश्चिमेस 930 किमी अंतरावरुन पुढे सरकले आहे. वादळाची तीव्रता अधिक तीव्र होत आहे, केवळ चक्रवाती परिवलन ते अवघ्या 48 तासांत तीव्र चक्रीवादळ रुपातरीत होईल.12 जूनपर्यंत अत्यंत तीव्र चक्रीवादळाची ताकद टिकवून ठेवण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ तीव्र चक्रीवादळात वेगवान होईल, असा अंदाज आहे. गुजरातच्या पोरबंदरच्या किनारी जिल्ह्याच्या दक्षिण-पश्चिमेला सुमारे 1,060 किमी केंद्रस्थानी राहिल्यास गुजरात सरकारने संभाव्य नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयारी केली आहे.
पुढील 48 तासांत केरळमध्ये मान्सून सुरु होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे, असे IMD ने म्हटले आहे. केरळमध्ये मान्सून सुरु होण्याशी संबंधित नवीन अपटेड समोर आले आहे. दक्षिण अरबी समुद्रावर पश्चिमेकडील वारे कायम आहेत आणि आग्नेय अरबी समुद्र, लक्षद्वीप आणि केरळ किनारपट्टीवर ढगाळपणा वाढला आहे. पश्चिमेकडील वाऱ्यांची खोली मध्यम उष्णकटिबंधीय पातळीपर्यंत आहे, दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागांमध्ये आणि संपूर्ण लक्षद्वीप क्षेत्रामध्ये आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मान्सूनच्या पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे, असे IMD सांगितले.