नवी दिल्ली : उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील थंडीची लाट शनिवारनंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे, तर उत्तर-पश्चिम, पूर्व आणि ईशान्य भारतात 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, पुढील 24 तासांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील बहुतांश भागात किमान तापमानात कोणताही लक्षणीय बदल होणार नाही आणि त्यानंतर हळूहळू 4-6 अंश सेल्सिअसची वाढ होईल.
तापमानात काय बदल होईल?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनूसार (IMD), वायव्य आणि मध्य भारतातील बहुतांश भागात 2 फेब्रुवारीपर्यंत कमाल तापमान 3-5 अंश सेल्सिअसने वाढण्याची आणि त्यानंतर घसरण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवसांत पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये 15-25 किमी प्रतितास वेगाने वाऱ्याची शक्यता आहे.
पुढील 3 दिवसांत पूर्व भारतात किमान तापमानात कोणताही लक्षणीय बदल होण्याची शक्यता नाही आणि त्यानंतर ते 2-4 अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल.
थंडीची लाट कायम
आयएमडीनुसार, पुढील 24 तासांत पंजाब, हरियाणा-चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या वेगळ्या भागात थंडी कायम असेल. मात्र, त्यानंतर थंडीची लाट कमी होईल.
पुढील 24 तासांत उत्तर प्रदेश, पूर्व महाराष्ट्र पूर्व राजस्थानमध्येगी काही ठिकाणी थंडी कायम राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तापमानात हळुहळू वाढ होईल.