पंतप्रधान मोदी आणि आसारामचा व्हिडिओ रिट्वीट करुन ICC ला पस्तावली

आयसीसीने रिट्विट केलं. यामध्ये आसाराम आणि पंतप्रधान मोदी एकत्र दिसत आहेत.

Updated: Apr 26, 2018, 01:18 PM IST
 पंतप्रधान मोदी आणि आसारामचा व्हिडिओ रिट्वीट करुन ICC ला पस्तावली  title=

नवी दिल्ली : लैंगिक अत्याचाराप्रकरणी आसारामला आजीवन कारावास सुनावण्यात आला. त्यामुळे सध्या आसाराम चर्चेत आहे. कोणी कायद्याच्या बाजूने बोलतय तर कोणी त्याच्या बाजूने उभा राहिलय. या सर्वांमध्ये 'बापू'ची मज्जा घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ICC च्या ट्विटर हॅंडलवरून एक ट्विट करण्यात आलं. खरतर हे एक रिट्विट होतं. 'ऑल्ट' न्यूजचा सहसंस्थापक प्रतिक सिन्हाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ ट्विट केला. ज्याला आयसीसीने रिट्विट केलं. यामध्ये आसाराम आणि पंतप्रधान मोदी एकत्र दिसत आहेत. या व्हिडिओला 'नारायण-नारायण' असे कॅप्शन देण्यात आलं. हे ट्विट काही वेळाने हटविण्यात आल. पण तो पर्यंत व्हायचा तो गोंधळ झाला होता.

कदाचित आयसीसी ट्विटर हॅडल करणाऱ्याला आपण वैयक्तिक अकाऊंट वापरत असल्याच वाटल असावं. त्यानंतर आयसीसीतर्फे याबद्दल माफी मागण्यात आली. पण तोपर्यंत युझर्सनी आयसीसीला ट्रोल करण्यास सुरूवात केली. यामध्ये नरेंद्र मोदींच्या भाषणातील चंक ही व्हायरल होतोय. जेव्हा मोदी म्हणतात, जेव्हा माझ्यासोबत कोणी नव्हत तेव्हापासून मला आसारामचा आशीर्वाद मिळतोय. एका व्हिडिओत तर पंतप्रधान मोदी हे आसारामच्या पाया पडताना दिसत आहेत.