Utter Pradesh News : लुधियाना (Ludhiana) रेल्वे स्थानकावरून (railway station) एक माणूस आपल्या पत्नीसह ट्रेनमध्ये चढतो. वाटेत त्याची पत्नी मरण पावते. मृतदेहासोबत पती तब्बल 500 किमीचा प्रवास करतो. जेव्हा टीटीई तिकीट मागायला येतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीच्या मृत्यूची माहिती मिळते.
बिहारच्या (Bihar) औरंगाबाद (aurangabad) जिल्ह्यात राहणारा नवीन हा त्याची पत्नी उर्मिलाला उपचारासाठी लुधियानाला घेऊन गेला. लुधियानाहून बिहारला जाण्यासाठी ते मयूरध्वज ट्रेनमध्ये बसले होते. काही किलोमीटर ट्रेनचा प्रवासातचं त्याच्या पत्नीचा रेल्वेत मृत्यू झाला.
मात्र, आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे नवीन यांना माहीत नव्हते. त्यांनी पत्नीचा मृतदेह घेऊन सुमारे 500 किलोमीटरचा प्रवास केला. नवीन सांगतो की, त्याची पत्नी ट्रेनमध्ये चढल्यानंतर झोपी गेली होती आणि झोपेतच पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे त्याला याबद्दल काहीही कळू शकले नाही.
शहाजहानपूर स्टेशनवर मृतदेह उतरवण्यात आला
जेव्हा टीटीईने नवीनकडे ट्रेनमध्ये तिकीट मागितले तेव्हा त्याच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे त्याला समजले. ही बाब लक्षात येताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी शहाजहानपूर जीआरपीला (GRP) माहिती दिली. त्यानंतर शहाजहानपूर रेल्वे स्थानकावर मृतदेह उतरवण्यात आला. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपासणी सुरू आहे.