IAS, IPS होण्यासाठी किती असावं वजन आणि उंची.. जाणून घ्या

स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी...

Updated: Sep 18, 2022, 02:44 PM IST
IAS, IPS होण्यासाठी किती असावं वजन आणि उंची.. जाणून घ्या  title=

IAS IPS Eligibility Criteria :  प्रत्येक तरूणाचं सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न असतं. यासाठी तरूण स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागतात. यामध्ये UPSC आणि MPSC या परीक्षा दिल्याने तुम्ही मोठ्या पोस्टवर जाऊ शकता. UPSC परीक्षा फार कठीण असते या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी तरूण-तरूणी दिवसरात्र एक करून अभ्यास करतात. तुम्हाला IAS IPS अधिकारी व्हायची इच्छा असेल तर तुमची उंची, वजन याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत.

IPS होण्यासाठी पुरुषांची उंची किमान 165 सेंटीमीटर असावी लागते. एससी-एसटी आणि ओबीसी प्रवर्गात येत असाल तर 160 सेंटीमीटर इतकी उंची लागते. महिलांची उंची 150 सेंटीमीटर लागते. तर एससी-एसटी आणि ओबीसी प्रवर्गात येत असाल तर 145 सेंटीमीटर आहे. आईपीएस होण्याची तुमच्या डोळ्यांची दृष्टी 6/6 किंवा 6/9 असणे गरजेचे आहे, तर कमकुवत दृष्टी असणाऱ्याना 6/12 व 6/9 असणे गरजेचे आहे

IAS
तुम्हाला फक्त UPSC परीक्षा पास करत चांगला रँक मिळवायचा आहे. या पदावर उंचीचं काहीही प्रमाण नाही. याचे सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आयएएस आरती डोगरा. आरती डोगरा यांची उंची 3.5 फूट आहे. त्या 2006 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत आणि सध्या राजस्थानमध्ये आहेत.

आयएएससाठी वजनाचा आणि दृष्टीचा कोणताही निकष नाही. यामध्ये वैद्यकीय चाचणी केली जाते, परंतु ती केवळ आपल्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी असते.