Govt Job : हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL)मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी.

Updated: Mar 15, 2021, 10:37 PM IST
Govt Job : हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती title=

मुंबई : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL)मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. HPCLने मॅकेनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि इंस्ट्रूमेंटेशन विभागातील  (HPCL Recruitment 2021)  इंजीनिअरींग या पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे, त्यांनी hindustanpetroleum.com  या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात.इथे करू शकता Apply (Can apply here)

https://jobs.hpcl.co.in/Recruit_New/recruitlogin.jsp या साइट वर क्लिक करुन उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

तसेच, https://hindustanPLium.com/hpcareers द्वारे संपूर्ण माहिती घेऊ शकता.

उमेदवार या पदांसाठी 15 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात.

महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची तारीख - 3 मार्च 2021
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 15 एप्रिल 2021

किती आणि कोणत्या पदांसाठी आहेत रिक्त पदे
मॅकेनिकल इंजिनिअर - 120 पदे
सिव्हिल इंजिनिअर - 30 पदे
इलेक्ट्रिकल इंजिनिअर - 25 पदे
इंस्ट्रूमेंटेशन इंजिनिअर - 25 पदे

पात्रता (eligibility criteria)
उमेदवारांकडे एआयसीटीई (AICTE) मान्यताप्राप्त, यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा डीम्ड विद्यापीठातून 4 वर्षे रेगुलर इंजीनियरिंग पदवी असली पाहिजे

वयोमर्यादा
उमेदवारांची वयोमर्यादा 25 वर्षे असावी.
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी 5 वर्षे
ओबीसीएनसीसाठी 3 वर्षे
पीडब्ल्यूडीडी (यूआर) साठी 10 वर्षे
पीडब्ल्यूडी (ओबीसीएनसी) साठी 13 वर्षे
पीडब्ल्यूडी (SC /ST) साठी 1 वर्षाची सूट देण्यात आली आहे

सलेक्शन प्रक्रिया (selection process)
सलेक्शनची प्रक्रिया कंप्यूटरवर आधारित टेस्ट, ग्रुप टास्क, पर्सनल इंटरव्यू नुसार होईल.

वेतन ( salary)
50हजार ते 1 लाख 60 हजार रुपयां पर्यंत
म्हणजेच CTC 15.17 लाख रुपये वेतन मिळेल.