Passport Application: पासपोर्ट बनवायचा आहे का? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Indian Passport: परदेशात जायचे असल्यास पासपोर्ट आवश्यक आहे. पासपोर्टशिवाय (Passport) परदेशात प्रवास करणे शक्य नाही. नवीन पासपोर्ट मिळवण्यासाठी भारतात दररोज अर्ज येतात. प्रत्येक देशाचा पासपोर्ट वेगळा असतो. त्यामुळे ओळख सिद्ध करण्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे.

Updated: Dec 2, 2022, 02:02 PM IST
Passport Application: पासपोर्ट बनवायचा आहे का? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया title=

Indian Passport: परदेशात जायचे असल्यास पासपोर्ट आवश्यक आहे. पासपोर्टशिवाय (Passport) परदेशात प्रवास करणे शक्य नाही. नवीन पासपोर्ट मिळवण्यासाठी भारतात दररोज अर्ज येतात. प्रत्येक देशाचा पासपोर्ट वेगळा असतो. त्यामुळे ओळख सिद्ध करण्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे. पण पासपोर्ट बनवण्याच्या प्रक्रियेबाबत अनेकांना योग्य माहिती नसते. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. पासपोर्टचं काम एजन्टशिवाय होत नाही, असा अनेकांचा समज आहे. दुसरीकडे, पासपोर्ट हातात येईपर्यंत आपल्याला मिळेलच ह्याची शाश्वती नसायची. आता गेल्या काही वर्षांपासून मात्र पासपोर्ट काढणे तुलनेने सोपे झाले आहे.

तुम्ही भारतीय नागरिक असाल आणि तुम्हाला पासपोर्ट बनवायचा असेल तर तुम्ही त्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. जर तुम्ही भारतीय नागरिक असाल आणि पासपोर्ट घ्यायचा असेल, तर तुम्ही या प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन पासपोर्टसाठी अर्ज करू शकता. आज आम्ही तुम्हाला पासपोर्ट मिळवण्याचा सोपा मार्ग सांगणार आहोत.

Step By Step Process Of Passport

- Passport Seva Online Portal नोंदणी करा.
- Passport Seva Online Portal नोंदणी केल्यानंतर लॉग इन करा.
- "Apply for Background Verification for GEP" लिंकवर क्लिक करा.
- फॉर्ममध्ये मागितलेली माहिती भरा आणि सबमिट करा.
- यानंतर, "Pay and Schedule Appointment" लिंकवर क्लिक करा.

बातमी वाचा- तात्काळ पैसे ट्रान्सफर करणारी IMPS सुविधा अशी काम करते, जाणून घ्या प्रक्रिया

- तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची आहे ते ठिकाण निवडा.
- अपॉइंटमेंट बुकिंगसाठी ऑनलाइन पेमेंट करा.
- "Print Application Receipt" वर क्लिक करा आणि तुमच्या अर्जाची प्रिंट घ्या. याशिवाय मोबाईलवर अपॉइंटमेंटचा मेसेजही आला असेल तोही सेव्ह ठेवा.
- आता तुम्ही तुमच्या मूळ कागदपत्रांसह अपॉइंटमेंट बुक केलेल्या ठिकाणच्या पासपोर्ट सेवा केंद्र (PSK) / प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय (RPO) येथे पोहोचा. - तिथे तुमची ओळख पडताळणी केली जाईल. यानंतर पोलिस व्हेरिफिकेशन होईल आणि तिथे सर्व काही बरोबर असेल तर काही दिवसांत पासपोर्ट घरी येईल.