अंग लगा दे रे...मेट्रोमध्ये तरुणींचा होळीचा अश्लील डान्स; VIDEO पाहून होईल संताप

Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रोमधील पुन्हा एकदा धक्कादायक आणि संतापजनक व्हिडीओ व्हायरल झालाय. अंग लगा दे रे...या गाण्यावर दोन तरुणींनी प्रवाशांच्या गर्दीत अश्लील डान्स केलाय. 

नेहा चौधरी | Updated: Mar 24, 2024, 09:03 AM IST
अंग लगा दे रे...मेट्रोमध्ये तरुणींचा होळीचा अश्लील डान्स; VIDEO पाहून होईल संताप title=
holi reel delhi metro girls play intimate cheap holi celebration video viral on social media

Delhi Metro Viral Video : देशभरात होळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सोशल मीडियावर सध्या होळीचे अनेक व्हिडीओ आणि रील्स पाहिला मिळतात. दररोज होळीचे असो किंवा वेगवेगळ्या गाण्याचे ट्रेंड व्हिडीओ दर तासाला व्हायरल होत असतात. होळीचा उत्साह पाहून सोशल मीडियावर अनेक भन्नाट व्हिडीओ पाहिला मिळत आहे. सोशल मीडियावर होळीचे अनेक गाणी आहेत, ज्यावर रील्स आणि व्हिडीओ बनवण्यात आले आहेत. पण सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच पण होळीसंबंधित व्हिडीओची चर्चा होत आहे. हा होळीचा व्हिडीओ पाहून नेटकरी काय सर्वांचीच डोक संतापाने तापल आहे. (holi reel delhi metro girls play intimate cheap holi celebration video viral on social media)

अश्लीलतेचा कळस!

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ हा दिल्ली मेट्रोमधील असून यामध्ये दोन तरुणींने अश्लीलतेचा कळस पार केला आहे. दिल्ली मेट्रोमधील पुन्हा एकदा हा अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. मेट्रो कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. दिल्ली मेट्रो ही तिच्या प्रवासासाठी किंवा चांगल्या गोष्टीसाठी नाही. तर तरुणांचे अश्लील चाळे आणि धावत्या मेट्रोमध्ये सोशल मीडियासाठी बनवलेले रील्स यामुळे दिल्ली मेट्रो बदनाम झाली आहे. गेल्या वर्षभरात दिल्ली मेट्रोमधील असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

हे व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी या असभ्य वर्तनाला आळा बसण्यासाठी मेट्रो प्रशासन असो किंवा दिल्ली महिला आयोगाने दखल घेतली. पण या काही लोकांमुळे दिल्ली मेट्रो बदनाम झाली आहे. यावेळी तर होळीचं निमित्त साधून दोन तरुणींनी धावत्या मेट्रोमध्ये डान्स केला. पण या डान्सचे हावभाव अश्लील होते की हा व्हिडीओ पाहून तळमस्तकाची आग डोक्यात जात आहे. 

दोन तरुणीने पांढऱ्या साडीत रंगांसोबत 'अंग लगा दे रे...मोहे रंग लगा दे रे...' या गाण्यावर डान्स केला. दिल्ली मेट्रोमधील प्रवाशांची गर्दी होती. तरीदेखील या दोन तरुणीने कसलीही परवा न करता अंग लगा दे रे या गाण्यावर डान्स केला. तरुणीच्या या डान्सला मेट्रोमधील प्रवाशांनीही दाद दिली नाही. मात्र त्यापैकी एका मात्र या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. 

सोशल मीडियावर संताप!

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील अकाऊंट Narendra Nath Mishra यांनी शेअर केला आहे. यानंतर नेटकरी संतापले असून या व्हिडीओवर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.