Holi 2024: रविवारी संपूर्ण देशभरात होळी सण साजरा केला जाईल. तसंच दुसऱ्या दिवशी धुळवड खेळली जाईल. सणांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व दुकानं सजली आहेत. रंग, पिचकारी विकत घेण्यासाठी लोकांची लगबग सुरु आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाला हा सण साजरा करायला आवडतं. दरम्यान अनेकदा धुळवड खेळताना आपण खिशात पैसे ठेवतो. यामुळे रंग लागल्याने नोटा खराब होतात. नोटांना रंग लागला असेल तर अनेक दुकानदारही त्या स्विकारण्यास नकार देतात. पण यासंबंधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियम नेमका काय सांगतो? हे जाणून घ्या. या नोटा खरंच चलनातून बाद होतात की त्या वापरु शकतो हे समजून घ्या.
होळी खेळताना रंग लावल्यानंतर वाईट वाटून घेऊन नका असं सांगितलं जातं. पण अनेकदा आपण ऑफिस किंवा इतर महत्वाच्या कामामुळे घऱाबाहेर पडलेलो असतो. पण लोक अशा स्थितीतही तुम्हाला रंग लावण्यापासून थांबत नाहीत. अशा स्थितीत खिशातील नोटा असतील तर त्यांनाही रंग लागतो.
नोटांना रंग लागला असेल तर दुकानदार या नोटा स्विकारण्यास नकार देतात. पण जर तुम्ही त्यांना आरबीआयचा नियम सांगितला तर ते नोट स्विकारण्यापासून नकार देणार नाहीत. कारण आरबीआयच्या नियमानुसार, कोणताही दुकानदार रंग लागलेल्या नोटा स्विकारण्यास नकार देऊ शकत नाही.
होळी, धुळवड खेळताना अनेकदा पाणी लागल्याने नोटा फाडतात. आरबीआयच्या नियमानुसार, देशातील सर्व बँकांमध्ये फाटलेल्या, चुरघळलेल्या नोटा घेऊन जाऊ शकता. यासाठी बँक तुम्हाला कोणतंही शुल्क आकारु शकत नाही. पण तुमचं त्या बँकेत खातं असणं गरजेचं आहे.
बँकेत तुम्ही फाटलेली नोट बदली करण्यासाठी गेलात तर बँक त्या नोटेच्या स्थितीनुसार तुम्हाला पैसे परत करते. उदाहरणार्थ, जर 2000 रुपयांची नोट 88 चौरस सेंटीमीटर (सेमी) असेल तर तुम्हाला संपूर्ण रक्कम मिळेल. परंतु 44 स्क्वेअर सें.मी.वर केवळ निम्मी किंमत उपलब्ध असेल. त्याचप्रमाणे तुम्ही फाटलेल्या 200 रुपयांच्या नोटेचे 78 चौरस सेंमी भरले तर पूर्ण पैसे मिळतील, पण 39 चौरस सेमी दिल्यास अर्धेच पैसे मिळतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या नियमांनुसार, प्रत्येक बँकेला जुन्या, फाटलेल्या किंवा चुरघळलेल्या नोटा स्वीकाराव्या लागतील. फक्त त्या बनावट असू नयेत.