Holi 2019: रंगांपासून स्कीन आणि केसांचं संरक्षण करण्यासाठी काही टीप्स

रंगांपासून केस आणि स्कीनचं रक्षण करण्यासाठी...

Updated: Mar 19, 2019, 11:55 AM IST
Holi 2019: रंगांपासून स्कीन आणि केसांचं संरक्षण करण्यासाठी काही टीप्स title=

मुंबई : धुलीवंदन साजरा करण्याची तयारी सुरु झाली आहे. प्रत्येक जण रंग किंवा गुलाल लावून हा सण साजरा करतो. अनेकांना रंगांचा हा सण साजरा करण्याची आवड आहे. पण असं असताना तुम्हाला तुमची स्कीन आणि केसांची काळजी घेणं देखील आवश्यक आहे. तुमची स्कीन आणि केस रंगांच्या साईट इफेक्टने वाचवण्यासाठी काही टीप्स नक्की फॉलो करा.

- चेहऱ्यावर आणि इतर भागावर रंगाचा साईट इफेक्त होऊ नये आणि स्कीनला जास्त काळ चिपकून राहू नये म्हणून खोबऱ्याचं तेल किंवा मॉस्चराईजर क्रीम लावा.

- रंगांची उधळण सुरु करण्याआधी ब्लीज, वॅक्सिंग, थ्रेडिंग करु नका. कारण यानंतर तुमची स्कीन अधीक संवेदनशील होऊ शकते.

- ओठांना रंगापासून वाचवण्यासाठी पेट्रोलियन जेली लावू शकता. लिप बामचा देखील वापर करु शकता.

- चेहऱ्यावर आणि अंगाला कमीत कमी 40 किंवा 50 एसपीएफचं सनस्क्रीन लावा. उन्हापासून बचावासाठी वाटरप्रूफ सनस्क्रीन लोशनचा वापर करा.

- तुमच्या केसांना काही होऊ नये म्हणून आधीच ऑलिव्ह ऑईल किंवा खोबऱ्याचं तेल लावा.

- रंग खेळण्यासाठी जात असताना १ तास आधी केसांना तेल लावा. जर केस गळणे किंवा ड्राय स्काल्पची समस्या असेल. एक रात्र आधीच डोक्याला स्कीनला तेल गरम करुन लावा.

- कॅस्टर ऑईल लावल्याने तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे केस अधीक घट्ट होतील.