लखनौ : मदरशांमध्ये हिंदू शिकतात असं कधी तुम्ही ऐकलं नसेल पण आज आम्ही तुम्हाला एका असा मदरशाबद्दल सांगणार आहोत जेथे हिंदू मुले देखील शिकायला जातात.
या मदरशामध्ये गेल्या 10 वर्षांपासून एक हिंदू शिक्षक गणित, विज्ञान आणि इंग्रजी शिकवत आहे. सामान्यतः असे मानले जाते की मदरशांमध्ये केवळ मुस्लीम मुलांकरता शिक्षण देणे आणि त्यांच्या मूल्यांना बळकट करण्यासाठी शिकवले जाते. पण उत्तर प्रदेशातील आग्रा येथील अशा प्रकारचं मदरसा हे एक नवीन उदाहरण आहे. विशेष म्हणजे केवळ मुस्लीम मुलांनाच या मदरशात प्रशिक्षण दिले जात नाही, तर हिंदू एकत्र येऊन येथे शिक्षण घेतात.
दरौथाचे मोईन उल इस्लाम मदरशामध्ये उर्दू, अरबी, पारसी तसेच इंग्रजी, हिंदी, गणित आणि विज्ञान विषय शिकवले जातात. एवढेच नव्हे तर संगणकाचे शिक्षणही इथे दिले जात आहे. सरकारच्या आदेशापूर्वीच मदरशांमध्ये, एका दशकापेक्षा अधिक काळापासूनच 'सांसारिक प्रशिक्षण' दिले जाते. म्हणजे हिंदू-मुस्लिम समाजातील मुले एकत्र बसून शिक्षण घेऊ शकतात.
1958 मध्ये बांधण्यात आलेल्या या मदरशामध्ये 450 मुले शिकत आहेत. दहा वर्षांपूर्वी इथे हिंदु मुलं शिकत नव्हते, परंतु आज येथे 202 हिंदू आणि 248 मुस्लीम मुले एकत्र अभ्यास करत आहेत. हिंदी व्यतिरिक्त, हिंदू मुले देखील उर्दू आणि अरबीचे शिक्षण घेत आहेत.