VIDEO: बहीण विधवा, मामाने भाचीच्या लग्नात दिला 11111111 रुपयांचा आशीर्वाद; लोक मोजून थकले

Viral Video : हरियाणातल्या एका लग्नाच्या घरातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मामाने लाडक्या भाचीच्या लग्नात एवढी मोठी रक्कम दिली की सगळ्यांना धक्का बसला.

आकाश नेटके | Updated: Nov 29, 2023, 09:12 AM IST
VIDEO: बहीण विधवा, मामाने भाचीच्या लग्नात दिला 11111111 रुपयांचा आशीर्वाद; लोक मोजून थकले title=

Viral Video : बहिण भावाचं नातं हे नेहमीच खास असतं. मात्र काही बहिण भावाची नाती ही पैशामुळे कायमची तुटली जातात. काही भाऊ बहिणी तर संपत्तीसाठी एकमेकांना कोर्टात देखील खेचतात. पण हरियाणातल्या एका भावाने त्याच्या बहिणीसाठी आणि तिच्या मुलीसाठी जे काही केलंय ते पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हरियाणातल्या एका लग्नाच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लग्नाच्या विधीसाठी आलेल्या मामाने भाचीसाठी आशीर्वाद म्हणून नोटांचा खच पाडला होता. या अनोख्या आशीर्वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हरियाणातल्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक भाऊ आपल्या विधवा बहिणीच्या घरी नोटांचा ढीग ठेवताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये भावाने 1,11,11,111 रुपये रोख दिल्याचा दावा केला जात आहे. यावेळी तेथे उपस्थित असलेले लोक अचंबित झाले. एवढेच नाही तर मामाने भाचीसाठी कोट्यवधी रुपयांचे दागिनेही दिले. सोशल मीडियातही या रोख रकमेच्या व्हिडिओची चांगलीच चर्चा होत आहे.

माध्यमाच्या वृत्तानुसार, व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती ही बावल परिसरातील आसलवास गावात राहणाऱ्या सतबीर असल्याचे म्हटलं जात आहे. रेवाडीच्या दिल्ली-जयपूर हायवेला लागून असलेल्या असलवास गावात सतबीरच्या बहिणीचे लग्न झाले होते. सतबीरला त्याच्या बहिणीची खूप काळजी आहे. तिच्यासाठी आधी त्याने घर बांधले. याशिवाय दोन्ही मुलांच्या लग्नाचा खर्चही त्यांनी उचलला होता. त्याच्या एकुलत्या एक बहिणीचा पती सहा वर्षांपूवी वारला होता. त्यामुळे भाचीच्या लग्नाआधी सतबीर आपल्या बहिणीच्या घरी त्याच्या गावातील लोकांसह भाट विधी करण्यासाठी पोहोचला होता. संध्याकाळी भाट विधी सुरू झाला तेव्हा तिथे आलेले सर्वजण थक्क झाले.

सतबीरने बहिणीच्या घरी 500 रुपयांच्या नोटांचे बंडल पाहुण्यांकडे जमा करायला सुरुवात केली. सतबीरने पाहुण्यांना एकूण 1 कोटी 1 लाख 11 हजार 101 रुपये दिले. याशिवाय सतबीरने त्याची बहीण आणि भाचीला कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि इतर वस्तू दिल्या. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा सगळा प्रकार पाहून तिथे उपस्थित असलेल्या लोकांचे डोळे पांढरे झाले.

दरम्यान, सतबीरचा स्वत:चा क्रेनचा व्यवसाय असून तो कुटुंबासह गावात राहतो. त्याच्याकडे मोठी जमीन देखील आहे. सतबीर सुरुवातीपासूनच आपल्या बहिणीला मदतीचा हात देत आहे. सतबीरने त्यांच्या बहिणीच्या मुलीचे लग्न आले असताना त्या भाटाच्या रूपाने असा आदर्श घालून दिला की, त्याची सध्या देशभर चर्चा होत आहे.