अहमदाबाद : पंतप्रधान मोदी यांच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाला गुजरात राज्यात तीव्र विरोध होत आहे. ज्या गावांतून हा प्रकल्प जाणार आहे. तेथील गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. नवसरीतील २९ गावांतील शेतकऱ्यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाविरुद्ध निषेध मोर्चा काढला.
दरम्यान, याआधी अहमदाबाद उच्च न्यायालयात १ हजार शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध करणारी प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत. भूमी अधिग्रहन कायद्यानुसार भूसंपादन करण्यात येत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे. बुलेट ट्रेनमुळे शेतकऱ्यांची जमिनी जाणार आहेत. त्यामुळे येथील शेतकरी विस्थापित होणार आहे. बुलेट ट्रेनमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे, त्यामुळे हा विरोध होत आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या विरोधामुळे बुलेट ट्रेनचे भवितव्य अधांतरी आहे.
Gujarat: Farmers from 29 villages in Navsari held a protest rally against bullet train project, earlier today. pic.twitter.com/ytPn6WZM5i
— ANI (@ANI) February 6, 2019
तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्यातूनही शेतकरी आणि अनेक राजकीय नेत्यांचा बुलेट ट्रेनला विरोध होत आहे. आधी चांगल्या सोयी-सुविधा द्या, प्रलंबित असलेली रेल्वेची कामे पूर्ण करा, मुंबईतील रेल्वेच्या विकासासाठी निधी द्या मगच बुलेट ट्रेनचे स्वप्न पाहा, असा विरोधी पक्षांतून सूर निघत आहे. गुजरात आणि महाराष्ट्राला बुलेट ट्रेनने जोडण्यात येण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. अहमदाबाद - मुंबई अशी बुलेट ट्रेन सुरु करण्यासाठी प्रयत्न आहे. मात्र, शेतकऱ्यांकडून या प्रकल्पाला विरोध होत असल्याने बुलेट ट्रेन होणार की नाही, याचीच उत्सुकता शिगेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी अहमदाबाद - मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाला गुजरातच्या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध केला आहे. आता नवसारी येथे विरोधात शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. त्यामुळे मोदींना महाराष्ट्रात नाही तर आता गुजरातमध्ये या प्रकल्पाच्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे.