गुजरात विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी समाप्त

गुजरात विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी समाप्त झालीय. गेल्या दीड महिन्यांपासून धडाडणा-या प्रचाराच्या 'तोफा' मंगळवारी सायंकाळी थंडावल्या. आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत.

Updated: Dec 12, 2017, 06:09 PM IST
गुजरात विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी समाप्त title=

गुजरात : गुजरात विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी समाप्त झालीय. गेल्या दीड महिन्यांपासून धडाडणा-या प्रचाराच्या 'तोफा' मंगळवारी सायंकाळी थंडावल्या. आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत.

कधी लागणार निकाल?

येत्या गुरूवारी १४ डिसेंबरला दुस-या आणि अंतिम टप्प्यात १४ जिल्ह्यांतील ९३ मतदारसंघात मतदान होणार आहे. तब्बल २ कोटी २२ लाख ९६ हजार ८६७ मतदार यादिवशी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यानंतर १८ डिसेंबरला होणा-या मतमोजणीकडं अवघ्या देशाचं लक्ष लागलंय.

भाजपपुढं काँग्रेसनं जोरदार आव्हान

गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपपुढं काँग्रेसनं जोरदार आव्हान उभं केलं असून, इथं चुरशीची निवडणूक रंगणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं अख्खं सरकार विरूद्ध काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातल्या खडाजंगीमुळं गुजरातचा रणसंग्राम चांगलाच गाजला.