अहमदाबाद : गुजरातमध्ये सध्या निवडणुकांचं वातावरण आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार आज थांबणार आहे. पण त्याआधीच काँग्रसेसाठी एक वाईट बातमी आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानाआधीच राजकोटमधील काँग्रेस नेते हरेश मोराडिया आणि त्यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची बातमी समोर येत आहे.
दोघांनी आत्महत्या का केली याबाबत अजून कोणताही पुरावा मिळालेला नाही. त्यांच्या जवळ कोणतं सुसाईट नोट देखील आढळलं नाही. त्यामुळे ही आत्महत्या की हत्या याबाबत चर्चा सुरु आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हरेश आणि त्यांची पत्नी यांनी विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पण ही आत्महत्या का केली गेली याची कोणतीही माहिती नाही. हरेश मोराडिया हे काँग्रेसच्या शेतकरी सेलचे नेते होते.