Guess Movie: 'हा' फोटो पाहून सिनेमा ओळखून दाखवा, तुमच्याकडे 2 सेकंदाची वेळ

दोन सेकंदात तुम्हाला 'या' सिनेमाचे नाव ओळखायचे आहे? 

Updated: Sep 23, 2022, 05:10 PM IST
 Guess Movie: 'हा' फोटो पाहून सिनेमा ओळखून दाखवा, तुमच्याकडे 2 सेकंदाची वेळ   title=

मुंबई : सोशल मीडियावर (Social media)  अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोमध्ये काही फोटो स्टार्सचे असतात, तर काही फोटो सिनेमांचे असतात. असाच एक सिनेमाचा फोटो (Guess Movie) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहुन तुम्हाला सिनेमाचे नाव ओळखायचे आहे. त्यामुळे तुम्हाला या सिनेमाचे नाव ओळखता येतंय का पाहा?

फोटोत काय? 
सिनेमातल्या एका सीनमधला (Movie)  हा फोटो आहे. फोटोतला हा सीन खुपच मजेदार आहे. या सीनवरून (Dialogue)  अनेक डायल़ॉगही प्रसिद्ध आहेत. तसेच अनेकदा सोशल मीडियावर या संदर्भातले मीम्सही वायरल झाले आहेत. तुम्हाला हा फोटो पाहून सिनेमा ओळखता येतोय का? दोन सेकंदात तुम्हाला याचे उत्तर द्यायचे आहे.  

चित्रपटातला हा सीन आहे?
फोटोत प्रसिद्ध अभिनेता अशोक सराफ (Ashok saraf) आणि अभिनेत्री अश्वीनी भावे (Ashwini Bhave) दिसत आहेत. या फोटोत अश्वीनी भावे डोळ्यावर मोठ्या काचेची चष्म्याची फ्रेम, लिंबूकलरची साडी, तोंडावर थोडासा मेकअप करून सुद्घा सुंदर दिसत आहेत. तर त्यांच्या समोर अशोक सराफ बसलेले आहेत. जो त्यांच्या सौंदर्याच कौतूक करत आहेत. यावेळी अशोक सराफ लिंबाचं लोणचं म्हटलं की माझ्या तोंडाला नळासारखी धार लागते. लिंबाचं लोणचं, लिंबाचं सरबत, लिंबाच मटण असे डायलॉग मारतो. या डायलॉगवर अश्वीनी भावे खुप असतात. हा सीन सांगून तुम्हाला या चित्रपटाचं नाव लक्षात आलं असेलचं.  

'हे' आहे उत्तर 
फोटोत दिसणारा चित्रपट मराठीतला सर्वांत प्रसिद्ध चित्रपट आहे. या चित्रपटाच नाव अशी ही बनवाबनवी (Ashi Hi Banwa Banwi) आहे. या चित्रपटाला आज 34 वर्ष पुर्ण झाली आहेत. आजच्याच दिवशी 23 सप्टेंबर1988 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील 'हा माझा बायको पार्वती', 'ते 70 रूपये वारले' हे डायलॉग खुप प्रसिद्ध आहेत. आज या चित्रपटाला 34 वर्ष पुर्ण होऊन सुद्धा सिनेमाची क्रेझ आजही कायम आहे. या चित्रपटावरून आजही मीम्स बनवले जातात.