Video Viral: लग्नमंडपात वऱ्हाड्यांसमोर नवरीनं केलं असं काही तरी....,नवरदेवासह पाहुण्यांनाही बसला आश्चर्याचा धक्काच

Trending Video Viral: सनी लिओनीच्या गाण्यावर नवरीने भन्नाट डान्स केला. तो डान्स पाहून नवरदेवासह सर्व पाहुण्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

Updated: Jan 11, 2023, 04:34 PM IST
Video Viral: लग्नमंडपात वऱ्हाड्यांसमोर नवरीनं केलं असं काही तरी....,नवरदेवासह पाहुण्यांनाही बसला आश्चर्याचा धक्काच title=
Groom And Bride Viral Video

Groom And Bride Viral Video: लग्नाच्या मंडपात अनेक गमतीजमतीचे किस्से होत असतात. नवरदेव आणि वधूसोबत मित्रमंडळ अनेक गमतीजमती करत असतात. अशा गमतीजमतीचे व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत असतात. असात एका लग्नातला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या लग्नमंडपात नवरीने कमालच केली असून नवरीने जे केलं ते पाहून नवरदेवासह सर्व पाहुण्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. नवरीने नवऱ्यासमोर असं काय केलं की, नवऱ्या सर्वांसमोर लाजला. 

या व्हिडीओत नवरीने नवऱ्याला पाहुण्यांसमोर उभं केलं. त्यानंतर त्याच्या हातात गुलाबाचे फुलं दिले. पाहुण्यासमोर नवरीने उभे केल्यानंतर नवरा हळव्या मनाने हसत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तर नवरीने नवऱ्याला सनी लियओनीचे लोकप्रिय 'गाणं मेरे सइयां सुपरस्टार' डेडिकेट करून भन्नाट डान्स केला. डान्स बघताच नवराही भर लग्नमंडपात लाजला असल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.  हा व्हिडीओ prabhatweddingbvlogger नावाच्या युर्जसने इन्स्टाग्रामवर शेअक केला. 

नवरा-नवरीचा हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत असून लाखों नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. तर हजारोंच्या संख्येत या व्हिडीओला व्यूजही मिळाले आहेत.